आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभेच्या निर्णयावर ठरेल वादग्रस्त गाळ्यांचे भवितव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हुडकाेकडूनघेतलेल्या कर्जाची परतफेड एकरकमी करण्यासाठी फुले अाणि सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांच्या माेजमापाचे काम पूर्णत्वास अाले अाहे. तसेच सर्वेक्षणात हाती अालेला डाटा संगणकीकृत करण्यात येत असून, त्यासाठी रविवारीदेखील नगररचना विभाग सुरू राहणार अाहे. दरम्यान, सर्वेक्षणात वादग्रस्त गाळ्यांचेही माेजमाप झाले अाहे. मात्र, संबंधित गाळेधारकांकडून प्रीमियम अाकारणी करून त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय महासभा घेणार अाहे.

पालिकेच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांना पुढील ३० वर्षांसाठी नव्याने करार करून देण्याचा ठराव महासभेने मंजूर केला हाेता. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी हालचालीही सुरू हाेत्या. त्यासाठी पालिकेतील १८ अभियंत्यांना फुले सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे माेजमापाचे काम दिले हाेते. या अभियंत्यांनी तीन दिवसांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले असून, त्यातून जमा झालेली माहिती संगणकीकृत करण्याचे काम सुरू अाहे. या माहितीच्या अाधारे काेणत्या गाळ्यासाठी किती प्रीमियम लागेल? याचा अाकडा काढणे शक्य हाेऊन पुढील कार्यवाही करणे साेपे हाेणार अाहे. तसेच मार्केट प्रीमियममधून किती रक्कम उभी राहू शकते, याचे चित्रदेखील स्पष्ट हाेणार अाहे.

१८ प्रकारच्या माहितीचे संकलन
गाळ्यांचेसर्वेक्षण करताना १८ प्रकारच्या माहितीचे संकलन केले अाहे. त्यात गाळ्याचा क्रमांक, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, मालकाचे नाव, भाडेकरू,दुकानात माळा टाकून चटई क्षेत्र वाढवले अाहे काय? दुकान कुठल्या ठिकाणी अाहे, दुकानात चालत असलेला व्यवसाय अादी माहितीचा समावेश अाहे.
सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू
फुलेमार्केटमध्ये २५९, तर सेंट्रल फुले मार्केटमध्ये ६५१ गाळे अाहेत. तिसऱ्या किंवा चाैथ्या मजल्यावरील बंद असलेल्या गाळ्यांच्या मालकांना सूचना िदल्या असून, त्यांचे माेजमाप रविवारीदेखील करण्याची प्रशासनाची तयारी अाहे. यापूर्वी झालेल्या माेजमापाचा डाटा अपडेट करण्याचे काम सुरू झाले.
पोटमाळा करणाऱ्यांना वाढीव कर
मार्केटमधीलकाही गाळ्यांची उंची ते ४.५ मीटर (१४ ते १७ फूट) अाहे. उंची जास्त असल्याने काहींनी मध्ये स्लॅब किंवा लाेखंडी पार्टिशन करत वर गाेदाम किंवा अजून एक मजला काढला अाहे. पर्यायाने संबंधित व्यापाऱ्यास दुकानाच्या मूळ चटई क्षेत्राच्या तुलनेत ६० ते ७० टक्के जागा अधिक वापरासाठी मिळाली अाहे. व्यापाऱ्यांनी नंतर स्वखर्चाने केलेल्या माळाेच्यांचेदेखील माेजमाप झाले असून, त्यासाठी चटई क्षेत्रानुसार प्रीमियमची वाढीव रक्कम अाकारली जाणार अाहे.
वादग्रस्त बांधकामांचीही नाेंद
पालिकेच्याफुले मार्केटमधील ‘एल’ पट्टयात सार्वजनिक शाैचालयावर बांधण्यात अालेल्या वादग्रस्त गाळ्यांचेही माेजमाप करण्यात अाले अाहे. यापूर्वी संबंधित गाळेधारकांना प्रशासनाने नाेटीस बजावल्यावर याबाबत महासभेने मंजुरी दिल्याचा खुलासा त्यांनी केला हाेता. त्यामुळे माेजमाप करण्याचे काम प्रशासनाने केले असून, याबाबतचा अंतिम निर्णयही महासभेत घेतला जाण्याची शक्यता अाहे. इतर गाळेधारकांप्रमाणे प्रीमियम भाडे अाकारून संबंधितांना गाळे दिले जाऊ शकतात.