आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम परवानगीपूर्वी आता घ्यावा लागेल थकबाकी नसल्याचा दाखला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घरांची विक्री अथवा नवीन बांधकामांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट येत अाहे. यात मागच्या थकबाकीचा मुद्दा चांगला ऐरणीवर अाला अाहे. भविष्यात पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बांधकाम परवानगी अथवा भाेगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित मालमत्ताधारकाने थकबाकी भरली अाहे का? याची खात्री केली जाणार अाहे. प्रभाग समितीतून ना हरकत दाखल मिळाल्यानंतरच परवानगी देण्यात यावी, या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या अाहेत.

महापालिका हद्दीत सुमारे ७० हजारांच्या अासपास मालमत्ता असून यात पक्की घरे तसेच खुले भूखंड याचाही समावेश अाहे. घरपट्टी पाणीपट्टीच्या माध्यमातून मिळणारा कर हे पालिकेचे स्व उत्पन्न अाहे. सुमारे ८० काेटी रुपये या माध्यमातून पालिकेच्या तिजाेरीत जमा हाेणे अपेक्षित असताना मात्र ३५ ते ४० काेटी रुपयांचा पल्ला गाठला जात अाहे. यात प्रमुख अडचण म्हणजे थकबाकी अाहे. मागचे येणे वसूल करण्यासाठी प्रशासनाचा कस लागत असून भविष्यात वाढती समस्या लक्षात घेता अातापासून त्यावर अाैषध शाेधले जात अाहे. यासाठी नगररचना विभाग केंद्रस्थानी ठेवला जात अाहे. प्रत्येक मालमत्ताधारकाला घरासंदर्भात काेणती ना काेणती मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी नगररचना विभागात यावेच लागते. बांधकाम परवानगी असाे की पूर्णत्वाचा दाखला असाे, यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना अाधी त्यांच्या मालमत्तेवर काेणती थकबाकी अाहे का, याची विचारणा केली जाणार अाहे. संबंधित मालमत्ताधारकांने अापल्या निवास असलेल्या प्रभाग समितीतून थकबाकी भरल्याची अथवा काेणतीही थकबाकी नसल्याचा दाखला दिल्यानंतरच त्याला नगररचना विभागातून मंजुरी दिली जावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू अाहेत.

प्रस्ताव सादर
प्रभाग समितीकडून नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात अाला अाहे. त्यावर अंतिम मंजुरीसाठी अायुक्तांकडे सादर करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...