आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- शहरातील रस्त्यांच्या डागडुजीकरिता लागणारे डांबर वितळण्यासाठी महापालिकेच्या कर्मचार्यांनीच खुद्द जुन्या वृक्षांच्या मुळावर घाव घातला. एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी कठोर पावले उचलली जात आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने खासगी मालमत्ता समजून वृक्षतोडीचा सपाटा लावला आहे. दरम्यान, उद्यानांच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना नसल्याने चोरट्यांकडून होणार्या वृक्षतोडीला प्रतिबंध करण्याऐवजी खुद्द अधिकार्यांकडूनच विनापरवाना 20 वर्षांपूर्वीच्या जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे.
शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या मेहरूण तलावाकाठी असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानाच्या सुरक्षेकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. 35 एकर परिसरात असलेल्या या उद्यानातील मोठमोठय़ा वृक्षांची चोरट्यांकडून वृक्षतोड होत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. याच संधीचा फायदा घेत मेहरूण परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेचे कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांच्याकडूनच वृक्षांची कत्तल केली जात आहे. डांबर वितळण्यासाठी ऐनवेळी इंधन उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून या महाशयांनी चक्क वृक्षांची कत्तल सुरू केली आहे.
कोणताही अर्ज नाही
मी सध्या पुणे येथे प्रशिक्षणासाठी आलो आहे. तथापि, बुधवारी दिवसभरात मेहरूणच्या उद्यानातील वृक्ष तोडण्यासंदर्भात कुठलाही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. विनापरवानगी वृक्षतोड झाली असल्यास पालिकेचा अधिकारी कि ंवा कर्मचारी असला तरी, त्यांच्यावर इतरांप्रमाणे कारवाई केली जाईल. दिलीप सूर्यवंशी, पर्यावरण अधिकारी
आपला संबंध नाही
मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानाच्या सर्व परिसराची जबाबदारी कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांच्याकडे आहे. तेथील सर्व कामकाज ते सांभाळतात उद्यानात वृक्षतोड झाली असल्यास त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एस. पी. भोळे, प्रभाग अधिकारी
सध्या कामे नाही
रस्त्यांना डांबरपट्टी करण्यास कॉम्पॅक्टर मशीनचा उपयोग केला जातो. यात डांबराचा ‘इमल्शन’चा वापर केला जातो. त्यात लाकडे जाळण्याची आवश्यकता नसते. इतर किरकोळ डागडुजीसाठी डांबर वितळवले जाते, मात्र सध्या शहरात असे कोणतेही काम सुरू नाही. सुनील भोळे, उपअभियंता बांधकाम
कारवाई अटळ
कायदा सर्वांसाठी सारखाच असून विनापरवानगी वृक्षतोड केली असल्यास संबंधित अधिकार्यावर कारवाई केली जाईल. डांबर वितळण्यासाठी वखारीतून लाकडे घेता आली असती, वृक्ष तोडण्याची आवश्यकता नव्हती. भालचंद्र बेहरे, उपायुक्त
वर्षभरातील खटले
शहरात विनापरवानगीने वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य, जेडीसीसी बँक व्यवस्थापक, काशिनाथ लॉजचे >संचालक, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी, गुरुद्वारा समिती व मेहरूण तलावाकडील रमेश जैन यांच्या बंगल्यातील वृक्षतोडप्रकरणी न्यायालयात खटले सुरू आहेत.
>कनिष्ठ अभियंत्याचा निर्लज्जपणाचा कळस
>मेहरूण परिसराची जबाबदारी असलेले कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांच्याशी साधलेला हा संवाद..
>शिवाजी उद्यानात सकाळी वृक्षतोड करण्यात आली. कर्मचार्यांकडून आपले नाव सांगण्यात आले.
मी उद्यानातील वृक्ष नव्हे, तर सुकलेल्या फांद्या तोडण्यास सांगितले होते. डांबर वितळण्यासाठी ऐनवेळी जळणाचे लाकूड मिळत नाही.
फांद्या नव्हे, तर वृक्ष तोडला आहे. त्यासाठी परवानगी घ्यावी लागते; ती घेतली आहे काय?
परवानगी घेतली नाही; पण आम्ही तोडले नाही. तांबापुरातील चोरटे सुकलेले झाड तोडूून नेतातच. मग आमची प्रॉपर्टी असल्याने काढून घेतले तर काय झाले?
यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.
जाऊ द्या साहेब, गुन्हे दाखल झाल्यावर पुढे काही होत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.