आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation LBT Inspector Transfer Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महापालिका ‘एलबीटी’ अधीक्षकांची उचलबांगडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेत एकाच टेबलवर अनेक वर्षे राहून स्वहित साधणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची खांदेपालट करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार स्थानिक संस्था कर विभागाचे अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह इतर विभागातील 14 कर्मचार्‍यांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी-कर्मचारी
स्थानिक संस्था कर विभागाचे अधीक्षक राजेंद्र पाटील यांची भांडारपालपदी उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी बाबूलाल सपकाळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच जगन्नाथ खडसे यांची प्रभाग समिती तीनमध्ये, सुनील गोराणे यांची अर्थ विभागात, सुरेश पाटील यांची वरिष्ठ लिपिकपदी, हरीश खडके यांची आस्थापना विभागात, रवींद्र तळेले- किरकोळ वसुली विभाग, विजय बाविस्कर- सार्वजनिक बांधकाम, सुधाकर सपकाळे व सुरेखा चौधरी- प्रकल्प विभाग आणि धनसिंग सपकाळे प्रभाग समिती एकमध्ये यांच्यासह अन्य तिघांच्या बदल्या झाल्या आहेत.

वाणींना अंतिम कारणे दाखवा नोटीस
स्थापत्य अभियंता सहायक मोहन वाणी यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विभागीय चौकशीत ठेवण्यात आलेल्या आरोपांवर त्यांनी कुठलेही उत्तर दिलेले नाही. याप्रकरणी त्यांची मूळ पदावर का नियुक्ती करण्यात येऊ नये? अशी विचारणा केली असून, त्यांना 15 जुलैपर्यंत खुलासा सादर करण्याची मुदत दिली आहे.