आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी नाक्यावर तपासणी; पहिल्याच दिवशी दोन व्यापार्‍यांवर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका हद्दीत येणार्‍या मालावर आकारल्या जाणार्‍या एलबीटी (स्थानिक संस्था कर)च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनातर्फे शहरातील चारही नाक्यांवर वाहनांची कागदपत्रे तपासणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी एलबीटी चुकवून माल आणणार्‍या दोन व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत येणार्‍या मालावर एलबीटी आकारणी केली जाते. मात्र, कर चुकवून शहरात माल आणणार्‍या दोन व्यापार्‍यांवर पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात आली. एमआयडीसीत डाळ उद्योग प्रक्रिया असलेल्या जी. आर. एजन्सीने परभणी येथून एक ट्रक मूग मागवला होता. या मालाची किंमत तीन लाख 50 हजार रुपये होती. कर चुकवून माल आणल्याने संबंधित व्यापार्‍यावर मूळ कराच्या 10 पट दंड आकारण्याची कारवाई करण्यात येणार आहे. उपायुक्त भालचंद्र बेहरे, एलबीटी निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पथकाने शहरातील चारही नाक्यांची तपासणी केली. शहराबाहेरच्या पावत्या करून नेरीनाका येथील दुकानात माल मागवल्याच्या संशयावरून नेरीनाका येथील व्यंकटेश ट्रेडिंग या दुकानाची उपायुक्तांसह पथकाने तपासणी केली.

12 कर्मचारी नियुक्त : महापालिका हद्दीत येणार्‍या मालाच्या तपासणीसाठी शहरात चार प्रमुख नाके आहेत. यात कुसुंबा, नेरी, बांभोरी व शिरसोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एका शिफ्टमध्ये एक लिपिक व एक शिपाई, असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.