आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालढकल: एलबीटीच्या उत्पन्नात कोटींचा तोटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेच्या उत्पन्नात मोठा वाटा असलेल्या स्थानिक संस्था कराच्या वसुलीकडे या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारीअखेर 8 कोटी 15 लाखांची तूट आली असल्याची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी कर अधीक्षकांना नोटीस बजावली असून त्यांची उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

2012-13 या आर्थिक वर्षात 80 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा प्रशासनाला होती. या विभागाकडून वर्षभरात समाधानकारक कामगिरी केली नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून वेळोवेळी झाला. मात्र, स्वतंत्र उपायुक्त नसल्याचे कारण पुढे करत या विभागाने वर्षभर वेळ मारून नेली. आर्थिक वर्ष सरत आलेले असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत पालिकेला अपेक्षित उत्पन्नतर सोडाच गेल्या वर्षी मिळालेली रक्कमही जमा न झाल्याची बाब प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी त्यांनी अधीक्षक राजेंद्र पाटील यांना नोटीस बजावली आहे.

नैसर्गिक 10 टक्के वाढही नाही- स्थानिक संस्था करातून पालिकेला सन 2010-11ला 45.26 कोटी मिळाले होते. तुलनेत सन 2011-12 या आर्थिक वर्षात 12.85 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के नैसर्गिक वाढ गृहित धरली तरी 5.81 कोटीने भर पडून किमान 63 कोटी 92 लाख रुपये स्थानिक संस्था करातून मिळणे अपेक्षित होते. 10 टक्के नैसर्गिक वाढ होणे लांबची बाब असून महिनाभराचा वेळ शिल्लक राहिला असताना गेल्या वर्षीच्या उत्पन्नाची बरोबरीही झालेली नाही.