जळगाव - जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने हाती घेतलेल्या अभियानासाठी प्रशासनही पुढे सरसावले आहे. शहर स्वच्छ असावे ही जशी पालिकेची जबाबदारी आहे, तशी प्रत्येक नागरिकाचीही आहे. रस्त्याच्या कडेला लहान-मोठा व्यवसाय करणारे विक्रेते, मुख्य रस्त्यांवरील दुकानदार, व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांनाही डस्टबिन बाळगण्याची शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार,असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.
सहकारातून समस्यांची मुक्ती करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या अभियानाची दखल घेत शहर स्वच्छतेसाठी मास्टर प्लॅन बनवण्याची तयारी आयुक्त संजय कापडणीस यांनी दर्शवली आहे. जळगाव शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी संस्था किंवा संघटनांची योगदान देण्याची तयारी असल्यास या विशिष्ट कामासाठी पालिकेचा नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल. सौंदर्य हरपलेले चौक सुशोभिकरण करण्यासाठी संस्था पुढे येत असल्यास पोलिस विभागाचे सहकार्य घेऊन तेथील अनधिकृत रिक्षा थांबे, अतिक्रमण आणि इतर समस्या मार्गी लावण्यात येतील. घर स्वच्छ रहावे, तसेच
आपले कार्यालय, व्यवसायाची जागाही स्वच्छ टापटीप रहावी, असे प्रत्येकाला वाटते. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून खासगी पालिकेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी स्वयंशिस्त बाळगणे गरजेचे आहे.
संजय कापडणीस, आयुक्त
आपणही सहभागी होण्यासाठी पुढील स्लाइडवर वाचा..