आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : खाविअाचा निषेध करत भाजप नगरसेवकांनी केला सभात्याग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चा करू देण्यासाठी महापौरांना घेराव घालताना भाजपचे नगरसेवक. - Divya Marathi
चर्चा करू देण्यासाठी महापौरांना घेराव घालताना भाजपचे नगरसेवक.
जळगाव : गतिमंद मुलांच्या उत्कर्ष विद्यालयासाठी भोईटे शाळेची इमारत मिळण्याच्या विषयावरून मंगळवारी महासभेत प्रचंड गोंधळ उडाला. चर्चेस विरोध केल्याने महापाैरांसमाेरील वेलमध्ये भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
 
प्रचंड दबावतंत्राचा वापर करूनही महापौर अापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने खाविअाच्या निषेधाच्या घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, सुमारे २० मिनिटे सभागृहाच्या बाहेर प्रचंड गोंधळ उडाला.
 
सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या पालकांनी थेट सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजाही तुटल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता. महापालिकेचीमहासभा मंगळवारी सकाळी ११ वाजता महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 
 सभेच्या सुरुवातीला भाजपचे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी गतिमंद मुलांच्या उत्कर्ष विद्यालयासाठी भोईटे शाळेची जागा मिळावी म्हणून चर्चा सुरू केली; परंतु महापौर नितीन लढ्ढा यांनी हा विषय अाज चर्चेचा नसल्याने खाली बसा अशी सूचना केली.
 
पण महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गतिमंद मुलांसह त्यांचे पालक ठिय्या मांडून बसलेले असल्याने विषयावर चर्चा करण्याचा आग्रह धरण्यात अाला. दरम्यान, महापौर अापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तसेच अांदाेलनकर्त्यांना अापली भूमिका समजावून सांगितल्याने चर्चा करण्यास नकार दिला. 
 
दरम्यान, भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी किमान चर्चा करा, निर्णय नंतर घेऊ, असा आग्रह लावून धरला. यावरून खाविअा भाजप नगरसेवकांमध्ये तू-तू...मैं-मैं झाली. सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबत असल्याची भावना वाढल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महापौरांच्या समोरील जागेत येत घोषणाबाजी सुरू केली.
 
खाविअाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात अाल्या. सुमारे २० ते २५ मिनिटे हा गोंधळ सुरूच असताना सत्ताधाऱ्यांकडून चर्चेच्या कोणत्याही हालचाली झाल्याने भाजपच्या सर्व सदस्यांनी सभा सुरू हाेण्याच्या पहिल्या १५ मिनिटांतच सभागृहातून काढता पाय घेत सभात्याग केला. 
 
घोषणांनी सभागृह दणाणले 
गेल्या स्थायी समिती सभेत सभापतींनी भाजप नगरसेवकांना बाेलू दिल्याने त्या ठिकाणी सभापतींसमाेरच ठिय्या अांदाेलनाचा अनुभव ताजा असताना महासभेतही भाजप नगरसेवकांना पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. सभापतींप्रमाणेच महापौरांनीही अजेंड्यावरील विषय नसल्याने भाजप नगरसेवकांना शाळेच्या विषयावर बाेलू देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे सत्ताधारी खाविअाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात अाली.
 
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच खाविअा मनमानी कारभार करत असल्याचा अाराेप करण्यात अाला. त्यामुळे सभागृह दणाणून गेले हाेते. तर आक्रमक भाजप सदस्यांच्या भूमिकेमुळे वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली हाेती.
 
या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी कैलास साेनवणे, श्यामकांत साेनवणे सुनील महाजन यांनी महापाैरांशी चर्चा केली; परंतु त्याचाही उपयोग झाल्याने सुमारे २० मिनिटे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले हाेते. 
 
अायुक्तांच्या मुदतवाढीचा ठराव 
‘अमृत’ याेजनेंतर्गत पाणीपुरवठा भुयारी गटारींच्या कामांना सुरुवात हाेणार अाहे. तसेच हुडकाे कर्जफेडीसाठी अायुक्त चांगले प्रयत्न करत असून नवीन अधिकारी अाल्यास पुन्हा त्यांना विषय समजून घेण्यास बराच कालावधी लागेल. त्यामुळे अायुक्त जीवन साेनवणेंना दाेन वर्षे मुदतवाढ द्यावी, असा ठराव करण्यात अाला. मनसेचे मिलिंद काेंडू सपकाळे यांनी मात्र या ठरावाला विराेध करून अायुक्तांनी असे काेणते विशेष काम केले की त्यांना मुदतवाढ द्यायची? असा प्रश्न केला अाहे. 
 
कर्मचारी पालकांमध्ये धक्काबुक्की 
भाजप नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर संतप्त पालकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी नाराज पालकांनी थेट सभागृहाच्या दरवाजावर अादळअापट केल्याने कर्मचारी पालकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. सभागृहात दाखल पालकांना मनपाच्या कर्मचाऱ्यांनी धक्का दिल्याने पालकांचा संताप अनावर झाला. या गोंधळात सभागृहाचा दरवाजा दुसऱ्यांदा तुटला. यापूर्वी मनपा शिक्षकांच्या अांदाेलनावेळी सभागृहाचे प्रवेशद्वार तुटल्याचे सांगण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...