आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा अाेटीएस प्रस्ताव स्वीकारा; राज्य मुख्य सचिवांचे हुडकाेला पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव महापालिकेने हुडकाेकडून घेतलेल्या कर्जापेक्षा अधिकची रक्कम भरणा केली अाहे. पालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याने यापुढे रक्कम भरणे अवघड अाहे. त्यामुळे शहरातील मूलभूत साेई-सुविधांवरही परिणाम हाेत अाहे. त्यामुळे पालिकेने दिलेला एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव स्वीकारावा, असे पत्र राज्याचे मुख्य सचिव एस. एस. क्षत्रिय यांनी हुडकाेला दिले.

पालिकेने विविध याेजनांसाठी हुडकाे या वित्तीय संस्थेकडून १९८९ ते २००१ दरम्यान वेळाेवेळी १४१ काेटी ३८ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले हाेते. त्यापाेटी पालिकेेने अातापर्यंत सुमारे २७३ काेटी २१ लक्ष रुपयांची परतफेड केली अाहे. दरम्यान, कर्जाची परतफेड वेळेवर झाल्याने २००४ मध्ये रिशेड्युलिंग करण्यात अाले हाेते. त्यासाठी ३१ मे २००४ राेजी १५ वर्षांचा कालावधी निश्चित केला हाेता. मात्र, त्यानंतरही हप्ते थकल्याने हुडकाेने डीअारटी काेर्टात धाव घेत पालिकेच्या विराेधात ३४० काेटी ७४ लक्ष रुपयांची डिक्री अाॅर्डर मिळवली हाेती. पालिकेने ही रक्कम भरावी, असा हुडकाेचा अाग्रह अाहे. परंतु, पालिकेने ही रक्कम भरण्यास विराेध दर्शवला असून याविराेधात डीअारटी काेर्टात धाव घेत त्या अादेशाला स्थगिती मिळवली अाहे. दरम्यान, पालिका हुडकाे यांच्यातील कर्जाचा तिढा साेडवण्यासाठी राज्य शासनाने मध्यस्थी करत अर्थ विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली अाहे. ही समिती मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील अाहे. या संदर्भात महापाैर नितीन लढ्ढा यांनीही हुडकाेला शासनाला विनंती केली हाेती. तसेच अायुक्त जीवन साेनवणे यांनी मुख्य सचिवांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार मुख्य सचिव एस. एस. क्षत्रिय यांनी १७ अाॅक्टाेबर राेजी हुडकाेला पत्र लिहले अाहे. पालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक अाहे. त्यामुळे हुडकाेने मनपाचा एकरकमी परतफेडीचा १३ काेटी ५८ लाखांचा प्रस्ताव स्वीकारावा, अशी सूचना केली अाहे.

हुडकाेच्यानकारानंतर हालचाली :
महापालिकेचेमहापाैर यांनी हुडकाेला पत्र लिहून कर्जाची रक्कम कमी करण्याची विनंती केली हाेती. त्यानंतर महापालिकेने शासनामार्फत स्वतंत्ररीत्या मुंबईच्या हुडकाे कार्यालयाकडे अाेटीएसचा प्रस्ताव पाठवला हाेता.

अायुक्त उद्या मंत्रालयात
गेल्याअाठवड्यात मंत्रालयात झालेल्या भेटीनंतर अायुक्त जीवन साेनवणे हे पुन्हा २८ राेजी मंत्रालयात जाणार अाहेत. या वेळी त्यांच्यासाेबत चार्टर्ड अकाउंटंट देखील उपस्थित राहणार अाहेत. शासनाने मनपाच्या अनुदानातील काही रक्कम परस्पर हुडकाेला भरली हाेती. त्यामुळे व्याजाची रक्कम कमी झाली अाहे. त्यानुसार मनपा हुडकाेच्या कर्जातून अाॅक्टाेबर २०१५ मध्येच मुक्त झाल्याचा निष्कर्ष निघत अाहे.यासंदर्भात अाकडेमाेड करून ती नगरविकासच्या उपसचिवांकडे सादर केली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...