आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation News In Marathi, Divya Marathi

मनपात आकृतिबंध नसल्याने अनुकंपावरील भरती रखडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या विविध विभागात कामकाजाचे स्वरूप पाहता किती कर्मचारी आस्थापना सूचीवर असावेत, याचा आकृतिबंध तयार नाही. आकृतिबंधच नसल्याचे कारण पुढे करत कालबद्ध पदोन्नत्या आणि अनुकंपावरील भरतीही रखडली आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या भरतीतही अनुकंपाधारकांना सामावून घेण्यात आले नसल्याने अनेकांचे वय निघून जात आहे.


पालिकेच्या सेवेत कार्यरत असताना मृत झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना आतापर्यंत वेळोवेळी एकगठ्ठा कामावर सामावून घेण्यात आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी नियुक्तीचे अधिकार आयुक्तांना असताना 20 कर्मचार्‍यांच्या यादीसंदर्भात अद्यापही विचार झालेला नाही. सन 2005मध्ये महासभेच्या मान्यतेने अनुकंपावरील भरती करण्यात आली होती. त्यानंतर नऊ वर्षांपासून अनुकंपाच्या यादीसंदर्भात प्रशासनाने कोणताही विचार केलेला नाही. मनुष्यबळ अपूर्ण पडत असलेल्या विभागात मक्तेदाराची माणसे नियुक्त केली जातात त्याऐवजी अनुकंपा यादीतील कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यास काय हरकत आहे? असा प्रश्‍न अनुकंपाधारकांकडून उपस्थित केला जात आहे. पालिकेत कर्मचार्‍यांची संख्या किती असावी? यासंदर्भात राज्य शासनाकडून आकृतिबंध मंजूर केला गेलेला नाही; त्यामुळे कर्मचार्‍यांच्या कालबद्ध पदोन्नत्या आणि अनुकंपाधारकांच्या नियुक्त्याही रखडल्या असल्याची स्थिती आहे.


एकाच वेळी 35 नियुक्त्या
पालिकेच्या विविध विभागात सेवा बजावत असताना मृत झालेल्या 35 कर्मचार्‍यांना एकाच वेळी सेवेत सामावून घेण्यात आले होते. 10 फेब्रुवारी 2005रोजी महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सेवेवर असताना मृत झालेल्या 20 कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याच्या दृष्टीने विषय झालेला नाही.