आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation News In Marathi, Housing Project, Hudco

म्हणणे मांडण्यासाठी महापालिकेला 10 दिवसांची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुलांसाठी पालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जापोटी आतापर्यंत 189 कोटी रुपये भरून झाले आहेत. मात्र, वेळेवर हप्त्यांची फेड न केल्याने 129 कोटी रुपये भरण्याच्या मुद्यावरून हुडकोने डीआरटी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पालिकेला आपले म्हणणे सादर करण्याची 10 दिवसांची संधी देण्यात आली आहे. याप्रकरणी 4 एप्रिलला पुढील कामकाज होणार आहे.


घरकुल उभारणीसाठी तत्कालीन नगरपालिकेतर्फे 1998 मध्ये हुडकोकडून 141.34 कोटी कर्ज घेतले होते. कर्जापोटी पालिकेने आजअखेर एकूण 189 कोटी 12 लाख रुपये भरले आहेत. यात मुद्दलाची रक्कम केवळ 25 कोटी 54 लाख तर व्याज 163 कोटी 58 लाख आहे. एवढे पैसे भरूनही पालिकेवर 435 कोटी रुपये थकबाकी असल्याचा दावा हुडकोकडून केला जात आहे. यापैकी 129 कोटी रुपये फेडण्याच्या मागणीसाठी हुडकोने डीआरटीमध्ये दावा दाखल केला आहे. या दाव्यात मंगळवारी झालेल्या सुनावणीत पालिकेने आपले अंतिम म्हणणे सादर करावे, यासाठी 4 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.


जेडीसीसीबाबत आज सुनावणी
थकित कर्ज वसुलीसाठी पालिकेच्या 17 मजली इमारतीचा लिलाव करण्याची नोटीस हुडकोने दिली होती. मात्र, प्रशासनाने ही इमारत आपल्याला तारण करून दिल्याचा हस्तक्षेप अर्ज जिल्हा बॅँकेने केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. या वेळी जिल्हा बॅँक गहाण खताची प्रत सादर करणार आहे. नियमित हप्तेफेड सुरू असताना लिलावाची नोटीस कशासाठी? असा मुद्दा पालिकेच्या वतीने मांडला जाणे शक्य आहे.