आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत बाह्य-अंतर्गत शक्तींचा उंदीर-मांजराचा खेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महानगरपालिकेच्या आयुक्तपदी संजय कापडणीस यांची नियुक्ती झाल्यापासून शहराचा विकास दूरच राहिला असून, महापालिका म्हणजे राजकारण्यांचा जुगारी अड्डा बनला आहे. बाह्य अंतर्गत शक्तींच्या उंदीर-मांजराच्या खेळात भ्रष्टाचाराचा सुकाळ झाला, तर शहरात विकासाचा दुष्काळ पडल्याचा आरोप शिवसेना महानगरने केला आहे. दरम्यान, महिन्याभरात परिस्थिती सुधारल्यास आंदाेलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.

मनपाच्या माध्यमातून कोणतीही विकासकामे होत नसल्याचे खापर थेट आयुक्तांवर फोडून इतिहासात कधी नव्हे, इतकी मानहानी त्यांच्या आगमनानंतर झाली. तसेच कर्जाचा बागुलबुवा दाखवून कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून ठेवले जातात, असे उपायुक्त प्रदीप जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी रावसाहेब पाटील, गजानन मालपुरे, प्रीतेश ठाकूर, राजेंद्र पाटील, कुलभूषण पाटील, गणेश सोनवणे, शोभा चौधरी, दिनेश जगताप, मोहन तिवारी आदी उपस्थित होते.

शहरातील समस्या मनपाच्या उदासीनतेबाबत उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याशी चर्चा करताना गजानन मालपुरे, कुलभूषण पाटील, गणेश सोनवणे, रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील आदी.