आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Politics News In Marathi

सत्ताधार्‍यांकडून सालार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अयशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ज्येष्ठ नगरसेवक करीम सालार यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी गटाच्या दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील नेत्यांकडून त्यांच्या मनधरणी करण्याचा पहिला प्रयत्न फोल ठरला आहे. खान्देश विकास आघाडीचे नेते सुरेश जैन यांच्यासोबत काम करण्याची सवय पडली असून इतरांसोबत काम करणे ‘सूट’ होत नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.

सत्ताधारी गटासोबत गेल्या 30-32 वर्षांपासून काम करत असलेल्या करीम सालार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. फारुख शेख यांचे नाव शिक्षण मंडळावर येण्याची शक्यता त्यांना वाटत असल्याने आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले होते. या प्रकरणी बुधवारी खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन चर्चेसाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र सालार घरी नसल्याने प्रत्यक्ष चर्चा न होता नंतर फोनवरून दोघांचे बोलणे झाले. या चर्चेचा काहीही उपयोग झालेला नसून नाराजीचे खरे कारण योग्य वेळी आमदार सुरेश जैन यांनाच सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महापौरांप्रमाणे आयुक्तांकडे पाकिटात राजीनामा पाठविला असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.

इतरांसोबत ‘सूट’ होत नाही
आमचे नेते सुरेश जैन यांच्यासोबत काम करण्याची सवय पडली आहे, त्यांनाच काय ते सांगेन. इतरांसोबत काम करणे आता सूट होत नाही. फारुख शेख यांचे कारण असते तर कधीच राजीनामा दिला असता. करीम सालार

त्यांच्यासाठी चांगली संधी असावी
फारुख शेख यांचे नाव माझ्या यादीतही नाही. इतर काही नाराजी आहे काय हे जाणून घेण्याचा प्रय} केला. मात्र संस्थांकडे लक्ष केंद्रित करायचे ते म्हणतात. त्यांना एखादी चांगली संधी चालून आलेली असावी. रमेश जैन, अध्यक्ष, खान्देश विकास आघाडी