आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Propoganda Work Stopped

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महापालिकेसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, सुरेश जैन, खडसेंची प्रतिष्ठा पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. 38 महिलांसह 75 नगरसेवक निवडण्यासाठी 2 लाख 90 हजार मतदार रविवारी मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना आमदार सुरेश जैन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.


महापालिकेवर गेल्या दहा वर्षांपासून आमदार जैन यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. सुमारे पावणे दोन वर्षांपूर्वी तत्कालिन नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्याच्या तपासाला गती आल्यामुळे आमदार जैन यांच्यासह आघाडीचे प्रमुख सूत्रधार दीड वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी यंदा निवडणूक लढवित असल्यामुळे आमदार जैन यांची प्रतिष्ठा आणि राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षाच्या राज्यपातळीवरील अनेक बड्या नेत्यांनी येथे जाहीर सभा घेतल्या.


405 उमेदवार रिंगणात
शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात असून कोणत्याही पक्षाला सर्व 75 जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. शिवसेनेचे तीन पदाधिकारी सत्ताधारी आघाडीकडून उमेदवारी करीत आहेत. सत्ताधारी आघाडीविरूद्ध विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न फसल्यामुळे भाजपा(70 उमेदवार), काँग्रेस (47), राष्‍ट्रवादी काँग्रेस (62), मनसे (46) हे पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. 39 विद्यमान तर 08 माजी नगरसेवकांसह 405 उमेदवार रिंगणात आहेत.