आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Remove Encroachment In Night

अतिक्रमणधारकांवर मनपा रात्री करणार कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशोत्सवानिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात रात्रीच्या वेळेस प्रचंड वर्दळ वाढली आहे. गर्दीमुळे वाहनधारकांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे; असे असतानाही मात्र हॉकर्स आपल्या गाड्या साहित्य रस्त्यावरच सोडून निघून जात आहेत. सूचना देऊनही नियम पाळल्याने आता पालिका प्रशासन रात्रीच्या वेळेस कारवाईसाठी रस्त्यावर उतरणार आहे.

नेहरू चौक ते भिलपुरा चौकीदरम्यान तसेच जिल्हा परिषद चौक ते नेरीनाका यासह सुभाष चौक परिसर फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे अडचणी येत असतात. वारंवार सूचना देऊनही तात्पुरत्या स्वरुपात अंमलबजावणी करूनही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत आहे. सध्या गणेशोत्सवाच्या काळात ही समस्या आणखी भेडसावत आहे.

विक्रेते दिवसा व्यवसाय करून आपल्या हातगाड्या पेट्या रस्त्याच्या कडेला टाकून घरी निघून जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो. महापालिकेकडे आलेल्या तक्रारीनंतर आता अतिक्रमण विभाग रात्रीच्या वेळेसदेखील कारवाई करणार आहे. यात रस्त्यावर मार्केटमध्ये पडलेल्या पेट्या तसेच हातगाड्या जप्त करण्यात येणार आहेत.