आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Result And Analysis

जळगावमध्‍ये ‘खाविआ’ला प्रतीक्षा कुबड्यांची; मनसेची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आमदार सुरेश जैन यांना घरकुल प्रकरणात अटक झाल्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत खान्देश विकास आघाडीने सर्वाधिक 33 जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी पाच नगरसेवकांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. दरम्यान, सत्तेत योग्य स्थान मिळाल्यास पाठिंब्याचा विचार करण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

जळगाव महापालिकेच्या 37 प्रभागातील 75 जागांसाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. आमदार जैन यांच्या गैरहजेरीत त्यांचे बंधू रमेश जैन यांनी सत्ताधारी खान्देश विकास आघाडीचे नेतृत्व केले. त्यांना 33 जागा मिळाल्या. त्या खालोखाल भारतीय जनता पक्ष 15, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 12, राष्ट्रवादी काँग्रेस 11, जनक्रांती 2, अपक्ष 1 आणि महानगरविकास आघाडीने 1 जागा मिळवली.

माजी महापौर रमेश जैन, विष्णू भंगाळे, किशोर पाटील यांच्यासह सत्ताधारी गटातील सर्वच प्रमुख उमेदवार विजयी झाले आहेत. जैन यांचे कट्टर विरोधक नरेंद्र भास्कर पाटील यांनीही सातव्यांदा विजय मिळवला आहे.

बहुमतासाठी हवा 38 चा आकडा : जळगाव महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 38 चा आकडा जमवावा लागणार आहे. खान्देश विकास आघाडीला यासाठी मनसे किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. या दोन्ही पक्षांनी वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. खान्देश विकास आघाडीनेही याबाबत घाई नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पुढीलस्लाइडमध्ये जाणून घ्या, खडसे आणि जैन यांच्यासाठी निकालाचा अन्वयार्थ