आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Summoning Affidavite

डीआरटीच्या धाकाने पालिका दाखल करणार प्रतिज्ञापत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - हुडकोने दाखल केलेल्या दाव्यात डीआरटी कोर्टाकडून होणार्‍या कारवाईचा फास गळ्यापर्यंत आल्याने महापालिकेकडून तातडीच्या बैठका घेतल्या जात आहेत. कारवाई टाळता येईल का? या दृष्टिकोनातून विचारविनिमय सुरू झाला असून सुनावणीदरम्यान अंतिम प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून हुडकोविरुद्ध महापालिका अशी न्यायाची लढाई मुंबईच्या डीआरटी कोर्टात सुरू आहे. घरकुल व अन्य कामांसाठी पालिकेने घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जात नसल्याने हुडकोने 130 कोटी भरण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात 6 मे रोजी डीआरटी कोर्टाने पालिकेच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा इशारा दिला आहे.

जप्तीची कारवाई झाल्यास..
हुडकोने केलेल्या मागणीनुसार पालिकेने रकमेचा भरणा न केल्यास डीआरटी कोर्ट महापालिकेच्या मालकीच्या विविध मालमत्ता हुडकोच्या ताब्यात देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जप्तीची कारवाई झाल्यास मोठी नामुष्की ओढवू शकते. यात पालिकेच्या मालकीची सर्व व्यापारी संकुले, जागांचा समावेश असेल.


आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकांचा सिलसिला सुरू
डीआरटी कोर्टातील 17 जून रोजी होणार्‍या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यानुसार नुकतीच एक बैठक झाली. परंतु नगररचना विभागाचे अधिकारी प्रदीप येवले नसल्याने पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.


प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या गतिमान
कर्जाची रक्कम भरण्यासंदर्भात पालिकेने यापूर्वीही प्रतिज्ञापत्र दाखल केले होते; परंतु आता अंतिम सुनावणी होणार असून त्यात डीआरटी कोर्ट अंतिम निर्णय देण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पालिकेच्यावतीने आगामी सुनावणीवेळी शेवटचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर पावले उचलली जात आहेत.