आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरपट्टी वसुलीसाठी मनपाने कंबर कसली, ४३ कोटींची थकबाकी अद्याप शिल्लकच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेनेमालमत्ता इतर कर थकवणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची मोहीम मंगळवारपासून सुरू केली. पहिल्याच दिवशी आठ बड्या थकबाकीदारांकडे पालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी गेले. यातील सहा थकबाकीदारांनी जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी मंगळवारीच थकीत कराची रक्कम भरली.

शहरातील वाढत्या थकबाकीमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशातच महापालिकेला नोटबंदीच्या निर्णयाचा आधार मिळाला. नगरविकास विभागाच्या आदेशानेे पालिकेने नागरिकांकडून बंदी घातलेल्या पाचशे हजाराच्या जुन्या नोटांद्वारे कराचा भरणा स्वीकारला. यातून मनपाने जवळपास सात कोटी रुपयांची अद्यापपर्यंत वसुली केली. तरीही ४३ कोटींची थकबाकी अद्याप शिल्लक आहे. उर्वरित वसुलीसाठी मनपाने कंबर कसली आहे. त्यामुळे मंगळवारपासून थकबाकीदारांना अंतिम नोटीस देऊन जप्तीची कारवाई करणार असल्याची कल्पना देण्यात आली आहे.

चारही प्रभागांतील टॉप १०० थकबाकीदारांची यादी तयार
महापालिकेतर्फेशहरातील चारही प्रभागांतील टॉप १०० थकबाकीदारांची यादी यापूर्वीच तयार करण्यात आली आहे. त्यांना जप्तीचे वाॅरंट, अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक चारमधील टॉप १००पैकी पहिल्या आठ बड्या थकबाकीदारांच्या घरी पालिका कर्मचारी गेले. जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी त्यातील सहा जणांनी पैसे भरले, तर उर्वरित दोघे बुधवारी पैसे भरणार आहेत. त्यामुळे कोणावरही जप्तीची कारवाई करण्यात आली नाही. बुधवारी कोणत्याही प्रभागात कारवाई होऊ शकते, असेही महापालिका प्रशासनाने कळवले आहे.

जप्तीची माेहीम कठोरपणे राबणार
जप्तीची माेहीम अत्यंत कठोरपणे राबवली जाणार असून, यात थकबाकीदारांचे घर, दुकान अशी कोणतीही मालमत्ता सील केली जाईल. तसेच थकबाकीदार नोकरदार असतील तर त्यांच्या कार्यालयांना तशी माहिती देण्यात येईल. जीवनसोनवणे, आयुक्त, मनपा, जळगाव

१२५ कुलूप खरेदी
जप्ती मोहीम कठोरपणे राबवली पाहिजे. जागेवरच कारवाई झाली पाहिजे यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी २५ तर गाळ्यांसाठी २५ असे एकूण १२५ कुलपांची खरेदी केले आहे. कर्मचारी कुलपांसह जप्तीच्या कारवाईला जात आहेत. दुकान, गाळ्यांच्या थकबाकीदारांवरही कारवाई केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...