आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिका निवडणूक, एमआयडीसीमध्ये आज मतमोजणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये जय्यत तयारी केली आहे. या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सायंकाळी या ठिकाणी मतपेट्या सील करून ठेवण्यात आल्या. एकूण सात ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.

सुटसुटीत व्यवस्था
मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप टाकून कार्यकर्ते, कर्मचारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभागांचा निकाल जाहीर करताना गोंधळ उडू नये म्हणून दोन गोडाऊनदरम्यान बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच प्रभाग अधिकारी, कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक, प्रभाग क्रमांक यांची माहिती फलकावर लावण्यात आली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होतील, असा अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.