आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेची निम्मी वाहने कालबाह्य; कायद्याची पळवाट शोधण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या जळगाव पालिकेच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पालिकेच्या ताफ्यात असलेल्या वाहनांपैकी निम्मी वाहने मोटर व्हेइकल अँक्टनुसार कालबाह्य झाली आहे. मुदत संपलेल्या वाहनांमध्ये आरोग्य, बांधकामसह अधिकार्‍यांच्या वाहनांचाही समावेश आहे, कायद्याचे पालन करीत एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहने सेवेतून काढणे शक्य नसल्याने कायद्यातील पळवाटा शोधल्या जात आहेत.

पाच लाख लोकसंख्या आणि 68.24 चौरस किलो मीटर क्षेत्रफळाचे पालकत्व करीत असलेल्या जळगाव महापालिकेच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. जळगाव महापालिकेकडे एकूण 157 वाहनांचा ताफा आहे. यातील 70 वाहनांची खरेदी सुमारे पंधरा वर्षांपूवी करण्यात आली होती. तांत्रिक दृष्ट्या मुदत संपलेल्या वाहनांमध्ये आरोग्य विभागातील ट्रॅक्टर, अग्निशमन दलातील बंब, डंपर, रोडरोलर, सुमो, अम्बॅसेडर, आर्माडा अशा वाहनांचा समावेश आहे. आर्थिक अडचणीच्या काळात कायद्याचे पालन करून बाद झालेली वाहने विकून टाकणे पालिकेला शक्य नाही. त्यामुळे सदर वाहनांच्या क्षमतेची तपासणी करून त्यांचे आयुष्य ठरविण्यात यावे किंवा कायद्यातील दुसरा काही पर्याय असल्यास त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पर्यायी मार्गाचा शोध सुरू
तांत्रिकदृष्ट्या वाहनांची मुदत संपली असली तरी यातील बर्‍याच वाहनांची स्थिती चांगली आहे. मुदत संपल्याने ही वाहने सेवेतून बाद करता येणार नाही. काही वाहनांची दुबार बांधणी करण्यात आली आहे. मात्र कायदा शेवटी कायदा आहे. नियम आहेत तसेच यातील काही पर्याय असल्यास त्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे.
-एस.जे.बोरोले, उपअभियंता