आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

मनपात ठणठणाट; विकासाचा डोलारा लोकप्रतिनिधींच्या निधीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नियमित कराचा भरणा करण्यासाठी तगादा लावणार्‍या पालिकेने आलेल्या पैशातून शहरातील विकास कामे केलेली नाहीत. पालिकेच्या तिजोरीत जमा होणारी रक्कम पगार, पेन्शन, कर्जफेडीवर खर्च होत असल्याची स्थिती आहे. वर्षभरात शहरात जी काही थोडीफार कामे झाली ती आमदार, खासदार आणि विशेष निधी तसेच शासनाच्या विविध निधीतूनच झाल्याचे उघड झाले आहे. नियमितपणे कराचा भरणा करूनही विकास कामे होत नसल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात मनसेचे पालिकेतील उपगटनेते मिलिंद सपकाळे यांनी सप्टेंबर 2013 पासून आतापर्यंत पालिकेने कोणती कामे केली? याची माहिती मागवली होती. यासंदर्भात महासभेसमोर सादर केलेल्या माहितीत 27 सप्टेंबर 2013 पासून 9 जुलै 2014पर्यंत 39 कामे झाल्याची यादी प्रशासनाने जोडली आहे. या यादीत खासदार निधी, आमदार निधी, केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातूनच विविध कामे झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. व्यापारी गाळ्यांच्या संदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे भाड्याचे उत्पन्न वगळता इतर उत्पन्नाच्या बाबी वर्षभरात कमी झालेल्या नाही. पालिकेचे उत्पन्न घटण्यामागे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांकडून केला जातो. तर प्रशासनाकडून अनावश्यक खर्च कपात केल्याची बतावणी केली जाते. धोरणात्मक निर्णय घेताना पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे महासभेत दिसून आले आहे.
करच भरायचा का?
आमदार, खासदार, विशेष निधीतून मोठी कामे केली जातात. किरकोळ कामांसाठी मनपाकडे पैसाच नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी असलेले खड्डे अजूनही तसेच आहेत. किरकोळ कामे देखील होत नसल्याने नागरिकांमध्ये नगरसेवकांबद्दल प्रचंड असंतोष आहे. मिलिंद सपकाळे, उपगटनेता, मनसे
तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतील कामे
तेराव्या वित्त आयोगातून के. के. कॅन ते म्हाडा कॉलनी नाल्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे. गीतांजली केमिकल्स ते सव्र्हे नंबर 183 पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे. खेडी रस्त्यालगत जोडणारा सव्र्हे नंबर 69/7 ते 69/1 पर्यंतचा डीपीरोड खडीकरण करणे.
महापालिका प्रशासनाचा एकच मंत्र
कुठलेही काम कधी होणार यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता वर्षभरापासून प्रशासनातर्फे एकच उत्तर दिले जात आहे. ‘निधीच्या उपलब्धतेनुसार’ विकास कामांसाठी अपेक्षित निधी कधी व कसा उभारला जाईल याचे उत्तर मात्र कुठल्याही अधिकार्‍याकडे नाही. आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात जेडीसीसी आणि हुडकोचे हप्ते नियमित भरून कर्मचार्‍यांना 1 तारखेला पगार, मक्तेदारांना काही प्रमाणात पैसे देऊन शहरातील विकासकामे देखील होत होती. मग असे काय झाले की, पालिकेकडे निधीच नाही.
अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामांसह विविध कामे झाली इतर निधीतून राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती स्मारके व पुतळे सुशोभिकरण कार्यक्रमांतर्गत महर्षी वाल्मीक यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण. अंगणवाडी निधींतर्गत शहरातील 15 ठिकाणी अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम. नागरी दलितेतर योजनेंतर्गत रचना कॉलनीमध्ये आरसीसी गटार बांधकाम. खान्देश मिल कॉलनीत डॉ. सहस्त्रबुद्धे ते यादव यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम. दत्त कॉलनीत काँक्रीट गटार बांधणे. दलीत वस्ती सुधारणा योजनेंतर्गत नॅशनल स्पोर्ट ते ममुराबादरोडपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे. युनिट क्रमांक 3 अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे. काट्याफाइल परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करणे.