आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporator Kailas Sonovane News In DivyaMarathi

कैलास सोनवणे आज न्यायालयात शरण येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रशांत सोनवणे खून खटल्यात नव्याने समाविष्ट केलेल्या ११ सह आरोपींपैकी नगरसेवक कैलास सोनवणेंसह सहा जण सोमवारी न्यायालयास शरण येणार आहेत.
यापूर्वीही २२ सप्टेंबर रोजी ११ सह आरोपींपैकी चौघे जण शरण आले होते. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असून सोमवारी त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे. महिनाभरापूर्वी ११ जणांना सहआरोपी केल्यानंतर त्यांना सोमवार (२२ सप्टेंबर) पर्यंतची मुदत दिली होती. या वेळेत संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही न्यायालयांनी जामीन फेटाळल्यामुळे सोनवणे कुटुंबीयांना शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. २२ सप्टेंबर रोजीच इतर सहआरोपी कैलास सोनवणे, भारती सोनवणे, नंदकिशोर सपकाळे, संजय प्रभाकर साळुंखे, सागर सोनवणे, जयदीप सोनवणे या सहा जणांनी शरण येण्यासाठी मुदत मागितली होती. त्यांना ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. तर एका सहआरोपीचे वय १८ वर्षे पूर्ण नसल्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्याची परवानगी बचाव पक्षाच्या वकिलांनी मागितली आहे.