आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्तीसाठी नगरसेवकांना हवंय खडसेंचं नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एकना अनेक समस्यांमध्ये अडकलेल्या महापालिकेसमाेरील कर्जाची काेंडी फाेडण्यासाठी खाविअासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता महसूलमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेतली. मकरसंक्रांतीला घेतलेल्या भेटीत पालिका जळगावकरांच्या हितासाठी गाेडवा वाढवण्याचे साकडे घातले. कर्जफेडीचे संपूर्ण श्रेय अापलेच राहील फक्त ताेडगा काढा, अशी विनवणी सर्व नगरसेवकांनी खडसेंना केली.
दाेन महिन्यांपूर्वी महसूलमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात अालेल्या एकनाथ खडसेंनी पालिकेच्या कार्यक्रमात कर्जमुक्तीसाठी काेंडी फाेडण्याचे अाश्वासन दिले हाेते. त्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी यावे, त्यांच्यासाेबत चर्चा करू, िवकासासाठी साेबत असल्याचे खडसे म्हणाले हाेते. दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर १५ जानेवारीचा मुहूर्त साधत उपमहापाैर सुनील महाजन खािवअा गटनेते नितीन बरडे यांच्या प्रयत्नातून गुरुवारी अजिंठा िवश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. िवशेष म्हणजे सर्व मतभेद िवसरत सगळ्याच पक्षांच्या नगरसेवकांनी मकर संक्रांतीच्या एकमेकांना शुभेच्छा िदल्या कर्जमुक्तीसाठी सुरात सूर मिसळत महसूल मंत्र्यांच्या दरबारी बाजू लावून धरली. भाजप खाविअातील दुरावा यानिमित्ताने कमी हाेताना िदसत अाहे.
मंत्रालयातील बैठकीत ठरणार भूिमका
महसूलमंत्र्यांसाेबत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कर्जफेडीसाठीचे सर्व अधिकार एकनाथ खडसेंना देण्यात अाले. खाविअाने भेटीची वेळ मागितल्याने अामदार डाॅ. गुरुमुख जगवाणी यांनी व्यापाऱ्यांनाही बाेलावून घेतले. कर्जफेडीची काेंडी फाेडण्यासाठी पुढाकार घेण्याचे साकडे घातले. यावर बाेलताना खडसेंनी पुढच्या अाठवड्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. यात जाे काही िनर्णय हाेईल ताे कायद्याच्या चाैकटीत िनयमानुसार घेतला जाईल. यात जी भूिमका ठरेल ती सर्व नगरसेवक गाळेधारकांना मान्य करावी लागेल, असे ठणकावून सांगितले.