आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाविआ नगरसेवकांनी घेतली जैन यांची भेट, फोटो उपमहापौरांकडून व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- घरकुल घोटाळा प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटकेत असलेले माजी आमदार सुरेश जैन यांना धुळ्याच्या कारागृहातून चार दिवसांची सुटी मिळाली आहे. रविवारी पॅरोलच्या शेवटचा दिवशी शहराचे उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह खाविआच्या काही नगरसेवकांनी जैन यांची भेट घेतली. या वेळी जैन यांनी विकासकामांचा आढावा घेतला असल्याची माहिती महाजन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

जैन यांना चार दिवस सुटी मिळाली होती; मात्र त्यांना धुळे जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असल्यामुळे ते कुटुंबीयांसह देवपूर भागात रहिवासाला थांबले होते. रविवारी सायंकाळी ४.३० ते ५.३० या तासाभरात उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक अजय पाटील, सादीक खाटील शांताराम सूर्यवंशी या चौघांनी जैन यांची भेट घेतली. जैन यांनी जळगाव शहराची सध्याची परिस्थिती कशी आहे? तसेच विकासकामांच्या संदर्भात आढावा घेतला. दरम्यान, जैन हे पूर्वीप्रमाणेच ठणठणीत असून त्यांचे जळगावातील प्रत्येक घटना-घडामोडींवरही बारीक लक्ष ठेवून आहे, असे उपमहापौरांनी सांगितले.
माजी आमदार सुरेश जैन यांच्यासोबतचा हा फोटो उपमहापौर सुनील महाजन यांनी रविवारी सोशल मीिडयावर टाकला आहे.

नागरिकांच्याही व्यथा
जळगावशहरातील नागरिक मला अनेक वेळा न्यायालयीन कामकाजावेळी भेटतात. या वेळी ते नेहमीच शहरातील व्यथा मांडत असतात. त्यामुळे आपण शहराची परिस्थिती जाणून आहोत, त्यासाठी नगरसेवकांनी शहरात विकास कामांच्या बाबतीत पुढाकार घ्यावा असा सल्लादेखील जैन यांनी महाजन यांना दिला. त्या वेळी महाजन यांनी सध्या मनपाकडे अनुदान नसल्याने विकासाचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांच्या अपेक्षा अपूर्ण आहेत. शहराला कुणी वालीच नसल्याचे सांगितले. यावर त्यांनी जे शक्य असेल ते करत रहा. किरकोळ कामांसाठी लोकांची नाराजी ओढवून घेता ती कामे मार्गी लावा. तसेच मला खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांवर विश्वास आहे, त्यामुळे एकजुटीने काम करा, असे सांगितले.