आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Councils Decision In Marathi News

मालमत्ता कर चारपटीने वाढण्याचे संकट टळले, प्रशासनाचा निर्णय, एप्रिलपासून अंमलबजावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बाजारमूल्यावर आधारित मालमत्ता कर मोजणीचा महासभेचा ठराव बाजूला ठेवून मालमत्तांचे वर्गीकरण करून १० ते ५० टक्के कर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बाजारमूल्यावर आधारित कर आकारणी झाल्यास मालमत्ता करामध्ये चौपट वाढीची शक्यता होती. महापालिकेच्या निर्णयामुळे हे संकट टळले आहे. या संदर्भातील अादेश प्रभाग कार्यालयांना पाठवण्यात आले असून एप्रिलपासून मालमत्तांवर नव्या पद्धतीने कर अाकारणी केली जाणार अाहे.
शहरातील मालमत्तांची करअाकारणी करताना तत्कालीन नगरपािलकेने सन २००१मध्ये प्रत्येक भागातील बांधकामाचे वर्गीकरण करून दर िनश्चित केले हाेते. िनयमानुसार या दरांमध्ये फेर मूल्यांकन हाेणे अावश्यक हाेते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. महासभेने ११ फेब्रुवारी २०१५ राेजी शहरातील मालमत्तांचे भांडवली मूल्य काढून त्यानुसार कराच्या अाकारणीचा ठराव केला हाेता. मात्र, या ठरावानुसार शहरातील एक लाखावर मालमत्तांचे भांडवली मूल्य काढण्यासाठी पािलकेत अस्तित्वात असलेल्या यंत्रणेला कामाला लावलेे तरी वर्ष-दाेन वर्षे वेळ लागण्याची भीती अाहे. या पद्धतीने सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण हाेईपर्यंत पािलकेचे उत्पन्न बुडत राहणे परवडणारे अाहे. त्यामुळे महासभेचा ठराव तूर्त बाजूला ठेवण्यात अाला अाहे.
नागरिकांनािदलासा देणारा निर्णय
उच्चभ्रूवस्त्यांमधील मालमत्तांचे मूल्य अधिक असल्याने पर्यायाने त्यांना मालमत्ता कर अधिक माेजावा लागणार हाेता. एखाद्या भागात एक हजार चाैरस फुटाचे पक्के घर अाणि त्याच्या शेजारी तेवढ्याच जागेत पत्र्याच्या घराला लागणाऱ्या कराच्या रकमेत तफावत येऊ शकते. शिवाय एकाच अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील मालमत्तेला वेगळी तर तिसऱ्या मजल्यावरील मालमत्तेसाठी वेगवेगळी कराची अाकारणी हाेऊ शकणार हाेती. यामुळे असंताेष िनर्माण झाला असता.
प्रशासनानेका काढला मधला मार्ग?
महापािलकाहद्दीत एक लाखांवर मालमत्ता अाहेत. प्रत्येक मालमत्तेचे प्रत्यक्षस्थळी जाऊन माेजमाप करण्यात प्रचंड वेळ जाणार हाेता. एकाच काॅलनीतील एकसारख्या क्षेत्रातील नव्या-जुन्या बांधकामांना कमी अधिक मालमत्ता कराची अाकारणी झाल्याने नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेऊन करदाते न्यायालयात जाण्याची भीती हाेती. त्यामुळे हा मधला मार्ग काढला.
‘एमअायडीसी’साठी स्वतंत्र दर
जुन्यानव्या एमअायडीसीतील मालमत्तांसाठी कराच्या अाकारणीचे स्वतंत्र दर निश्चित केले अाहेत. यात १० चाैरस मीटर उत्पादन क्षेत्रासाठी १३२, अनुत्पादन क्षेत्रासाठी ९९, खुल्या जागेसाठी ३३ रुपये दरानुसार मालमत्ता कराची अाकारणी करण्याचे प्रस्तावित अाहे.