आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम झाल्यानंतर मागवल्या हरकती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने अारक्षित जागांवर घरकुल बांधले. काही ठिकाणी रहिवासीही राहायला गेले, तेव्हा महापालिकेने अारक्षित जागांवरील बांधकामाबाबत नागरिकांच्या हरकती मागवल्या हाेत्या. विशेष म्हणजे २००२ मध्येच महापालिका नगरविकास विभागाच्या सहाय्यक संचालकांनी अारक्षित जागेवरील घरकुलांचे हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा अहवाल शासनाला दिला असताना महापालिकेने मात्र घरकुल बांधून झाल्यावर २००५ मध्ये नागरिकांच्या हरकती मागवल्या हाेत्या.
महापालिकेने बांधलेल्या घरकुलासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवलेल्या अहवालानुसार महापालिकेच्या नावे नसलेल्या पिंप्राळा शिवारातील गट नंबर २१२, २१३, २१७, २१९, २२०/१, २२०/२, २२१/१, २२१ /२, २२२/१, २२२/३, २२३/१, २२३/२, २२४/३, २६०, २७३ या खासगी मालकीच्या जमिनीवर घरकुलांचे बांधकाम झाले अाहे. या शेतजमिनीला जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषक परवाना घेण्यात अालेला नाही. या जागेवर बांधलेल्या घरकुलांचा बांधकाम नकाशाही मंजूर झालेला नाही. ही जमीन अद्यापही महापालिकेची नसून ७/१२ उताऱ्यावर खासगी व्यक्तीची अाहे. या जागेपैकी काही जागांवर महापालिकेने अारक्षणे प्रस्तावित केली अाहेत, ते अारक्षण टाकण्यात अालेला विकास अाराखडा शासनाने मंजूर केलेला नाही. बांधकाम करण्यात अालेल्या जमिनीपैकी गट नंबर २१३ ही जमीन ट्रस्टच्या मालकीची असताना जमिनीच्या विक्रीबाबत धर्मदाय अायुक्तांची परवानगी घेण्यात अालेली नाही.
गट नंबर २२०/१ या गटाच्या ७/१२ उताऱ्यावर बेकादेशीर व्यवहार, असा शेरा असताना जमीन मालकाने महापालिकेसाेबत विक्री व्यवहार केला अाहे. या जागांची खरेदी करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे अावश्यक हाेते. मात्र, अशी परवानगी घेतलेली नसल्याने अारक्षणावरील घरकुलाचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे अहवालात म्हटले अाहे.

या आरक्षण क्रमांकावर मागवल्या हरकती
महापालिकेने घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी अारक्षित जागांबाबत नागरिकांकडून हरकती घेणे अावश्यक हाेते. असे असताना पालिकेने मात्र घरकुलांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर २२ मे २००५ राेजी स्थानिक दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करून महापालिकेच्या अारक्षण क्रमांक ८०, ८१, ८४, ८९ ९० बाबत हरकती मागवल्या हाेत्या. यावर उल्हास साबळे यांनी हरकत नाेंदवली हाेती.