आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी राखणार दाेन्ही सभापती पदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापािलकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या ज्याेती चव्हाण खाविअाचे नितीन बरडे यांच्यात लढत हाेणार अाहे. तसेच महिला-बालकल्याण समिती सभापतिपदासाठी खाविअाच्या संगीता दांडेकर मनसेच्या पद्मा साेनवणे यांच्यात लढत हाेणार अाहे. मात्र अल्प मतात असूनही दाेन्ही सभापती पदे राखण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांची खेळी यशस्वी हाेण्याची शक्यता अाहे.
राज्यस्तरीय राजकारणातील वरीष्ठ नेत्याच्या मदतीने पािलकेत महत्वाची पदे मिळवण्यासाठी जाेरदार हालचाली सुरु अाहेत. यासाठी भाजपतर्फे साेमवारी स्थायीच्या सभापती पदासाठी ज्याेती चव्हाण यांचा अर्ज दाखल करण्यात अाला हाेता. तर मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने खाविअातर्फे स्थायी सभापती पदासाठी िनतीन बरडे यांचे दाेन अर्ज दाखल करण्यात अाले. महिला-बालकल्याण समिती सभापतिपदासाठी संगीता दांडेकर यांचे दाेन अर्ज, मनसेतर्फे पदमा साेनवणे यांचा अर्ज दाखल करण्यात अाला अाहे. तथापि, राज्यात अाणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपतर्फे स्थायी समिती सभापतीपद ताब्यात घेण्यासाठी केलेल्या हालचालींना पूर्णपणे यश मिळाले नसल्याने दाेन्ही पदे राखण्यात सताधाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता अाहे.