आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकर्स स्थलांतराची प्रक्रिया बारगळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बारीकसारीक नियाेजन करून हाॅकर्सच्या स्थलांतराची तयारी असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला पहिल्याच दिवशी हाॅकर्सने झटका दिला. जागेसाठी काढण्यात येणाऱ्या लकी ड्राॅकडे वारंवार निराेप देऊनही हाॅकर्सने पाठ फिरवली. त्यामुळे अाता पाेलिस प्रशासनाला पत्र देऊन कारवाईसाठी विनामूल्य बंदाेबस्त देण्याची विनंती करण्यात येणार अाहे.
सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या अनुषंगाने शासनाने अति तत्काळ शहरांतील रहदारीचे रस्ते फुटपाथ माेकळे करण्याचे अादेश दिले अाहेत. त्या दृष्टीने महासभेत हाॅकर्सचे स्थलांतर करण्याचा ठराव मंजूर केला अाहे. ही कारवाई पाेलिस मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने करायची अाहे. स्थलांतरासाठी अतिक्रमण विभागाने शाेधलेला साेमवारचा मुहूर्त हाॅकर्सने पाठ फिरवल्याने टळला अाहे. चार दिवसांत तीनवेळा निराेप देऊन तसेच साेमवारी निराेप देऊनही गाेलाणी मार्केट १७ मजलीसमाेरील हाॅकर्स चिठ्ठी काढण्यासाठी पालिकेत अाले नाहीत.

प्रभाग निहाय सफाई मक्त्यासाठी ४२ निविदा
मनपाच्याप्रभागनिहाय सफाईच्या मक्त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. सोमवारपर्यंत ४२ निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निविदा सोमवारी उघडण्यात येणार होत्या; मात्र लेखापरीक्षक सुभाष भोर हे उपस्थित नसल्यामुळे त्या उघडण्यात अाल्या नाहीत. उपायुक्त प्रदीप जगताप, आरोग्याधिकारी उदय पाटील भाेर या तीन सदस्यीय समितीसमोर निविदा उघडण्याचे कामकाज होणार आहे.

प्रतिसाद नसल्याने अडचणी
अतिक्रमण विभागाच्या वतीने साेमवारी जागेबाबत साेडत काढण्यात येणार हाेती. परंतु हाॅकर्सने पाठ फिरवल्याने सर्व प्रक्रियेवर पाणी फेरले. काही विघ्नसंताेषी लाेक यात अडथळा अाणत असल्याने अाता पाेलिस पालिका यांची संयुक्त कारवाई असल्याने पाेलिसांनी कार्यवाहीसाठी विनामाेबदला पाेलिस बंदाेबस्त द्यावा, असे पत्र देण्यात येणार अाहे.

हाॅकर्सच्या बैठका सुरूच
पालिका प्रशासनाने स्थलांतराचा निर्णय घेतला असून ताे अटळ अाहे. त्यामुळे हाॅकर्स काेणत्याही परिस्थितीत स्थलांतर राेखण्यासाठी प्रयत्नशिल अाहेत. शहरातील रस्ते माेकळे करण्यासाठी प्रशासन सर्वताेपरी प्रयत्न करीत अाहे. प्रशासनाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अाता हाॅकर्स गटागटाने बैठका घेऊन चर्चा करू लागले अाहेत.