आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरानंतर निधी मिळेल, एक पैशाचाही भ्रष्टाचार होऊ न देता विकासकामे करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्जामुळे महापालिकेचे कंबरडे माेडले अाहे. गेली काही वर्ष राजकीय अस्थिरतेचाही परिणाम भाेगावा लागत अाहे. शहरातील रस्त्यांची चाळणी झाली असून गटारींची दैनंदिन सफाई हाेत नसल्याने साफसफाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला २५ काेटींचा निधी मंजूर झाल्याचे पत्र मंगळवारी मनपाला प्राप्त झाले अाहे. या निधीतून प्रमुख रस्त्यांची पाणीपुरवठ्याचे काम केले जाईल. एवढेच नव्हे तर एक पैशाचाही भ्रष्टाचार होऊ देता या कामाच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापाैर नितीन लढ्ढा यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
‘खाविअा’ म्हणजे अायत्या बिळावर नागाेबा : भोळे
मुख्यमंत्र्यांनी दिलेला २५ काेटींचा निधी हा भाजपमुळेच मिळाला. खाविअाने श्रेय घेऊ नये. माझ्यासह नेत्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच शहराला निधी मिळाला. यासंदर्भात अाजच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अाभार मानले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शहराला अाणखी २५ काेटींचा निधी देण्याचे अाश्वासन दिले आहे, असा दावा भाजपचे अामदार सुरेश भाेळे यांनी केला अाहे. फटाके फाेडून श्रेय घेणारी खाविअा म्हणजे “अायत्या बिळावर नागाेबा’ असल्याची टीकादेखील त्यांनी केली अाहे. त्यामुळे मनपातील निधीच्या राजकारणाचा दुसरा अंक पुन्हा सुरू झाला अाहे.
मुख्यमंत्र्यांनी १९ जून २०१५ राेजी जळगाव दाैऱ्यावर असताना शहरासाठी २५ काेटींचा निधी जाहीर केला हाेता.

पाठपुरावा काेणाचा हे जळगावकरांना माहीत
^निधी मिळावा म्हणून काेणी काय प्रयत्न केले, हे सगळ्यांना माहीत अाहे. त्यामुळे अामदारांनी विकास कामांकडे लक्ष देण्याची गरज अाहे. त्यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे किमान भाजपच्या नगरसेवकांसाठी तरी प्रत्येकी ५० लाखांचा निधी अाणावा. तसेच अाणखी २५ काेटी मिळत असतील, तर अाम्ही केव्हाही ठराव करून द्यायला तयार अाहाेत. नितीनलढ्ढा, महापाैर
प्रश्न : कामातील भ्रष्टाचार कसा राेखणार?

महापाैर : महापालिकेंतर्गत हाेणाऱ्या विकास कामांसाठी अाता ई-निविदा प्रक्रिया राबवली जाते. मक्तेदाराने कामाची जबाबदारी घेतल्यानंतर गुणवत्तेसाठी गॅरंटीचा काळ एक वर्षाचा ठेवण्यात येणार अाहे. कामाची संपूर्ण जबाबदारी मक्तेदारावर राहील. वर्षभरात काही अडचणी अाल्यास दुरुस्ती करून घेतली जाईल. ताेपर्यंत मक्तेदाराची सुरक्षा अनामत रक्कम अदा केली जाणार नाही. तसेच कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केले जाणार अाहे.

प्रश्न : विकास कामांची निवड काेणत्या निकषाने केली जाईल?
महापाैर : शहरातील प्रमुख रस्त्यांवरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मुख्य रस्तेच खराब असल्यास वाहतूकही खाेळंबते. त्यामुळे रस्त्याच्या कामाची गरज लक्षात घेऊन प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देण्यात अाले अाहे.

प्रश्न : नियाेजन काेणत्या कामांचे?
महापाैर : नागरिकांनासध्या खड्ड्यांची समस्या अधिक भेडसावत अाहे. मुख्य रस्त्यांवरचा प्रवास अानंददायी व्हावा, ही अपेक्षा असते. त्यामुळे शहरातील मीटरपेक्षा माेठ्या रस्त्यांचा समावेश यात करण्यात अाला अाहे. तसेच काही पाणीपुरवठ्याची कामेही यातून हाेतील. यात पुष्पलता बेंडाळे चाैक ते सिंधी काॅलनी, स्वातंत्र्य चाैक ते अण्णा भाऊ साठे चाैक, डी मार्ट ते काव्यरत्नावली चाैक, काव्यरत्नावली चाैक ते अाकाशवाणी चाैक, काेर्ट चाैक ते गणेश काॅलनी चाैक, गाेविंदा रिक्षा स्टाॅप ते भाेईटेनगर रेल्वेगेट, रेल्वेगेट ते पिंप्राळा साेमाणी मार्केट, रेल्वेगेट ते नवसाचा गणपती मंदिर रस्ता, कस्तुरी हाॅटेल ते अशाेक किराणा, कृउबाच्या मागचा रस्ता यासारख्या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्यात अाला अाहे. तसेच काॅलनी परिसरातील काही रस्त्यांची कामेही हाेणार अाहेत.

प्रश्न : २५ काेटी केव्हा मिळणार?
महापाैर : शासनानेनिधी मंजूर केला असला, तरी तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागणार अाहेत. निधीची घाेषणा झाल्यानंत महासभेत ठराव करून २५ काेटींतून करावयाच्या ८४ कामांचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर केला अाहे. परंतु, निधी मिळाल्याने त्यातील साडेचार काेटींची कामे इतर निधीतून करण्यात अाली अाहेत. त्यामुळे प्रस्तावात नवीन कामांचा समावेश करावा लागणार अाहे. यापूर्वी ज्या भागाला संधी मिळाली नाही, त्या भागांतील कामांची गरज लक्षात घेऊन नवीन प्रस्ताव अाठवडाभरात दिला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे ताे निधी मिळेल. तरी यासाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता अाहे.

प्रश्न : महापालिका प्रशासनाचा अंकुश कसा राहणार?
महापाैर : महापालिका सध्या अतिशय बिकट परिस्थितीतून मार्ग काढत अाहे. पालिकेला अपेक्षित निधीचा अाकडा खूप माेठा अाहेे. परंतु, अत्यंत वाईट परिस्थितीत २५ काेटींचा अाकडा जास्त वाटत आहे. त्यामुळे एखाद्या रस्त्यावर पुन्हा पुन्हा काम करण्याची मानसिकता नाही. विकासाचा बॅकलाॅग पाहता संपूर्ण शहरात कामे करायची अाहेत. अशा परिस्थितीत निधीचा पै अाणि पै याेग्य ठिकाणी खर्च केला जावा, याच्या सूचना अायुक्तांना दिल्या अाहेत. गुणवत्तेत कुठेही तडजाेड खपवून घेतली जाणार नाही. कामाची गुणवत्ता हाच निकष राहणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...