आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत घोटाळे करणाऱ्यांचे मोठे रॅकेट, अनेक गैरव्यवहारांची चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपात अनेक गैरव्यवहारांची चौकशी करण्यात आली असून कारवाई केली जात आहे. परंतु भय इथे संपत नसून भ्रष्टाचार आर्थिक घोटाळे करणाऱ्यांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आर्थिक घाेटाळे करणाऱ्यांना अतिरिक्त रकमा देऊ नये, अशी मागणीही केली आहे.

मनपात मालमत्तेची परस्पर विल्हेवाट, पैशांची अफरातफर आदी बाबी संघटनेने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या अहेत. पालिकेत सात लाखांच्या महिला बालकल्याण विभागाच्या निधीचा अपहाराचा संशय व्यक्त करत नुकसान करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम अदा करण्यात येऊ नये, अदा करायची असल्यास आयुक्तांनी स्वत:च्या पगारातून रकमा द्याव्यात, अशी मागणी अनिल नाटेकर शिवराम पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निलंबनाची कारवाई झालेल्या डॉ. विकास पाटील यांची २०१२ मध्ये सरळ सेवेत पदावर नियुक्ती झाली होती. डॉ. पाटील यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मूळ वेतन ग्रेड पे मिळून मिळणारा ३५ टक्के नॉन प्रॅक्टिकल्स अलाउन्स चुकीच्या मार्गाने लावून घेतल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
नॉन प्रॅक्टिकल्स अलाउन्स हा फक्त शासन सेवेत वैद्यकीय अधिकारी या पदावर काम करणाऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे त्यांनी २०१२ ते२०१५ या कालावधीत ४६ महिन्यांत सुमारे लाख ३० हजार रुपयांचा अपहार केला असून त्यांना तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक प्रवीण पंडित यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे.