आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभेत खडाजंगी: दुनियाभरची माया जमवली; एका मिनिटात घरी पाठवू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अायुक्तांना फिरायला वेळ मिळताे; पण स्वाक्षरी करायला वेळ नसल्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी स्थायी समितीत जाेरदार वादंग झाले. खाविअाने तर थेट ‘तुमचे कारस्थान बाहेर काढायला वेळ लागणार नाही. दुनियाभरची माया जमवली अाहे, अाम्ही माणुसकी साेडली नाही; अन्यथा एका मिनिटात घरी बसाल’, असा शाब्दिक हल्ला चढवला. कार्यपद्धतीत बदल झाल्यास ठाेस भूमिका घेण्याचा इशारा सत्ताधाऱ्यांनी दिला. यामुळे भविष्यात अविश्वासाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता अाहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण हाेईपर्यंत साफसफाईसाठी कामगार पुरवठ्याच्या अादेशावर स्वाक्षरी करण्यास हाेत असलेल्या विराेधावरून शुक्रवारी स्थायी समिती सभेत प्रचंड वाद झाला. सभागृहात अाराेग्याधिकाऱ्यांसह उपायुक्त फक्त अायुक्तांची स्वाक्षरी बाकी असल्याचे सांगतात अाणि अायुक्त स्वाक्षरी करायला तयार नाहीत, अशी माहिती पुढे येताच सभापती नितीन बरडे यांनी अाराेग्याधिकारी उदय पाटलांना थेट अायुक्त संजय कापडणीस यांच्या बंगल्यावर पाठवले. काही मिनिटांत अायुक्त थेट सभागृहात अाले.

शहरातील स्वच्छतेची परिस्थिती बिकट झाली अाहे. महिनाभराचा कालावधी उलटताे, तरी कामगार पुरवले जात नाहीत. यावरून प्रशासन गंभीर नसल्याचा अाराेप खान्देश विकास आघाडीसह भारतीय जनता पक्षानेही केला. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी सभा संपेपर्यंत गरमागरम वातावरण होते.

अायुक्त सभागृह नेत्यांच्या दालनात
सभागृहातअधिकारी अायुक्तांच्या स्वाक्षरीसाठी विषय लांबल्याचे सांगत हाेते. त्यावरून वादही झाला. सभा तहकूब करण्यात अाली. लढ्ढा अाणि अायुक्त यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. मात्र, सभेनंतर काही वेळातच अायुक्त सभागृह नेत्यांच्या दालनात दाखल झाले.
पदाधिकाऱ्यांसमाेर झालेल्या चर्चेत अायुक्तांनी ३५० कामगार नियुक्तीची काेणतीही फाइल तयार नसल्याचे तसेच ती माझ्याकडे अालीच नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे प्रशासनातील अधिकारीच अशा पद्धतीने दाेन वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने प्रशासनात अाता दुफळी तयार झाल्याचे पाहायला मिळते.

मनपात टाकणार कचरा
अायुक्तांनीसाफसफाईच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन जनतेला न्याय दिल्यास शनिवारपासून नगरसेवक अापल्या वाॅर्डातील कचरा पालिकेत टाकतील, असा इशारा सभापती बरडे यांनी दिला. तसेच अायुक्तांनी टेबल वाजवून बाह्या अावळल्याचा खाविअा, भाजप राष्ट्रवादीने निषेध करत सभात्यागही केला.

स्वाक्षरीवरून झाला गाेंधळ
निविदाप्रक्रियेस महिना लागेल. ताेपर्यंत शहराला वेठीस धरता सभागृहाने ठराव केल्याप्रमाणे ३५० कामगार पुरवण्याच्या अादेशावर सही करण्याचा अाग्रह सभागृहाने धरला. परंतु, अात्ताच स्वाक्षरी करणार नसल्याची भूमिका अायुक्तांनी घेतली. सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ, असेही जाहीर केले. परंतु, अधिकारी एकमेकांवर ढकलाढकली करत अाहेत. काेणीच गांभीर्याने घेत नाही. अाता अधिकारी राजकारण करत अाहेत. राजकारणच करायचे असेल तर, राजीनामा द्यावा यावे मैदानात, असे अाव्हान दिले. यावर लढ्ढा कापडणीस यांच्यात वाद झाला.
स्थायी सभेत नितीन लढ्ढा आयुक्त संजय कापडणीस यांच्यात खडाजंगी झाली. या वेळी एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेप करताना.
बातम्या आणखी आहेत...