आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेची आता कसरत, कर्मचा-यांना आज थकित पगार मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- डीआरटीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देऊन उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिलासा दिला आहे. असे असले तरी हुडकोकडे दरमहा तीन कोटी रुपये भरावे लागणार आहोत. या व्यतिरिक्त एक कोटी जेडीसीसी बँकेचे देणे सुरूच आहे. एकूण चार कोटींची फेड करून वेतन इतर कामांचा खर्च यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. न्यायालयीन लढा आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहता पालिकेची गाडी रुळावर आणण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
महापालिकेची गोठवलेली बँक खाती खुली करण्यासंदर्भातील आदेश बुधवारी सायंकाळी ७.१५ वाजता पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत. दरम्यान बँकांची वेळ संपल्याने गुरुवारी सकाळीच पुढील पत्रव्यवहार केल्यावर सायंकाळपर्यंत पगार, पेन्शन देणे शक्य होणार आहे. न्यायालयीन लढ्यासाठी मुंबईत ठाण मांडून असलेल्या आयुक्तांनी बुधवारी पालिकेत आल्यावर आधी बँकेत असलेल्या शिलकीची माहिती घेतली. हुडकोची दरमहा तीन कोटींची देणी वाढल्याने उत्पन्न वाढीसाठी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. सायंकाळी ४.३० वाजता आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याविषयी चर्चा केली. पालिकेचे दरमहा उत्पन्न सुमारे १० कोटींच्या घरात असून खर्च मात्र १६ कोटींचा होणार आहे.