जळगाव- विधानसभा निवडणुकीनंतर पालिकेच्या स्थायी समितीत ईश्वरचिठ्ठीने खान्देश विकास आघाडीला धक्का दिला आहे. त्यानंतर शहरातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता सत्ताधारी खान्देश विकास आघाडी, भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्वांनीच वाट पाहण्याची धोरणे अवलंबले आहे. मनसेची भूमिका या वेळी निर्णायक ठरणार असून खाविआने बदलत्या परिस्थितीत राष्ट्रवादीला किंवा भाजपला सभापतिपदासाठीही सहकार्य करण्याची तयारी ठेवली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य निवृत्त झाल्यानंतर नवीन सदस्यांच्या निवडीसाठी गटनेत्यांची बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. सभागृहातील एकूण संख्याबलानुसार आता सत्ताधाऱ्यांना केवळ चार सदस्य स्थायी समितीवर पाठवता येणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रतिस्पर्धींची ताकद वाढली आहे. त्यातच ईश्वरचिठ्ठीने धक्का दिल्यावर खान्देश विकास आघाडीने आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची मानसिकता ठेवली आहे.
रिक्त जागांवर सदस्य पाठवताना सत्ताधा-यातर्फे नितीन लढ्ढा, गणेश सोनवणे, सदाशिव ढेकळे चेतन शिरसाळे यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, बदललेली राजकीय समीकरणे पाहता हसे करून घेण्यापेक्षा उमेदवार देण्याचा निर्णयही ‘खाविआ' घेऊ शकते. सभापतिपद हातात राहणार नसल्याने रमेश जैन हे विरोधी बाकावर बसण्यापेक्षा स्थायी समितीत जाणे पसंत करण्याची शक्यता अधिक आहे. भारतीय जनता पक्षातर्फे डॉ.आश्विन सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र पाटील, सुचिता हाडा यांची नावे चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादीतर्फे मुक्तारबी रसूल शालिनी काळे यांना स्थायीत पाठवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सभापतिपद मिळत असल्यास गटनेते सुरेश सोनवणे स्थायीत दाखल होऊ शकतात. र्त मनसेच्या झेंड्याखाली असलेल्या नगरसेवकांच्या गटाकडून स्थायी समितीसाठी मिलिंद सपकाळे, ललित कोल्हे सिंधुताई काेल्हे यांना पाठवले जाऊ शकते.
स्थायी समिती सदस्य कुणाला पाठिंबा द्यायचा, यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्यातर्फे दाेन नावे सुचवण्यात अाली अाहेत. मात्र, अजित पवारांच्या भेटीनंतर आमची भूमिका जाहीर करणार आहोत. - सुरेशसोनवणे, गटनेते, राष्ट्रवादी
वरिष्ठांशी चर्चेनंतर निर्णय
स्थायीसमिती सदस्यपदासाठी पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. दोन-तीनदिवसांत वरिष्ठांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात नावांवर सहमती होऊ शकते. डॉ.आश्विन सोनवणे, गटनेते,भाजप