आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांना बाजू मांडण्यासाठी मुदत, मनपाच्या याचिकेवर ११ राेजी कामकाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिके संदर्भात दाखल वेगवेगळ्या चारही याचिकांवर गुरुवारी कामकाज हाेऊ शकले नाही. परंतु, या याचिकांमधील प्रतिवादी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने अाैरंगाबाद खंडपीठात अाता दाेन अाठवड्यांनी कामकाज हाेणार अाहे.
महापालिकेने मुदत संपलेले गाळे सील करण्याची केलेली कारवाई, तसेच त्याला राज्य शासनाने दिलेली स्थगिती. यासाेबतच गाळ्यांसंदर्भात पालिकेच्या महासभेत केलेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावावर शासनाने निर्णय घ्यावा, याबाबतीत अाैरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या चार याचिका दाखल अाहेत. या याचिकांमधील मुद्दे एकमेकांशी सुसंगत असल्याने त्याचे कामकाज न्यायमूर्ती अार.एम.बाेर्डे न्यायमूर्ती चिमा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमाेर सुरू अाहे. त्यावर गुरुवारी कामकाज हाेणार हाेते. परंतु, न्यायालयाची मुदत संपल्याने बाेर्डावर कामकाज येऊ शकले नाही. त्यानंतरही याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड.विनाेद पाटील यांनी सुनावणी दुसऱ्याच दिवशी घेण्याची विनंती केली. परंतु, याच प्रकरणातील प्रतिवादी पालकमंत्री एकनाथ खडसे यांचे वकील अजित काळे यांनी त्यांचे उत्तर तयार नसल्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याकरिता वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यामुळे पालकमंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी अाता दाेन अाठवड्यांनी कामकाज हाेणार अाहे.

अायुक्तही खंडपीठात
सुनावणीच्या कामकाजासाठी गुरुवारी महापालिका अायुक्त संजय कापडणीस अाणि नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम हेदेखील अाैरंगाबाद खंडपीठात गेले हाेते.