आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipality Gives Tender Of Rain Water Harvesting Work To Private Agency

रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम खासगी एजन्सीला देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्याबाबत महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याबाबत सक्तीच्या अंमलबजावणीसाठी टेंडर काढून खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यंदा जिल्ह्यासह शहरालाही दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. परिणामी, पाणीबचतीसह जलपुनर्भरणासाठी विविध संस्था व नागरिक पुढाकार घेत आहेत. तसेच महापालिकेनेही रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सक्ती केली होती; पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. तसेच बांधकाम मंजुरीसाठी आलेल्या शहरवासीयांकडून ही सिस्टीम बसवण्यासाठी अनामत स्वरूपात पाच हजार रुपये घेतले जात होते; परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून ही रक्कम तशीच पडून आहे.

तथापि, अलीकडेच महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत नागरिकांना सक्ती केली आहे; परंतु त्याची ठोस अंमलबजावणी पालिकेच्या अधिकार्‍यांकडून होऊ शकत नाही. त्यामुळे महापौर किशोर पाटील यांनी टेंडर काढून हे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला असून, नियुक्त संस्था सक्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवून घेणार आहे.

महापालिकेचा जनजागृती रथ
शहरात नळांना तोट्या नसण्यासह इतर कारणांमुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी केली जात आहे. पाणीटंचाई असताना नासाडी होऊ नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घ्यावी. वाघूर धरणात जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला मुबलक पाणी मिळावे, यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे सवरेत्तम उपाय आहे. याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेचा जनजागृती रथ संपूर्ण शहरात फिरवण्यात येणार असून, त्यातून पाण्याचे दुर्भिक्ष आणि पाणीबचतीचा संदेश दिला जाणार आहे.