आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव मनपाच्‍या 384 बखळ जागांचे पंचनामे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिका हद्दीतील 384 जागांवर कधी काळी घरे, गोदाम आणि इतर वास्तू होत्या. सद्य:स्थितीत या ठिकाणच्या मालमत्ता पाडल्या गेल्या असल्या तरी कागदोपत्री त्या जागेसाठी मालमत्ता कराची आकारणी सुरूच आहे. मालमत्ताच अस्तित्वात नसल्याने तसेच त्याचा भरणाही होत नसल्याने कराचा आकडा फुगत आहे. अशा बखळ जागांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
थकित किंवा वसूल न झालेल्या मालमत्ता कराच्या रकमेचा आकडा दरवर्षी वाढत आहे. मागील बाकी आणि चालू वसुलीची एकत्र गोळाबेरीज करून वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. वादग्रस्त किंवा थकित वसुली न झाल्याने प्रशासनाच्या कामगिरीवर प्रo्नचिन्ह उपस्थित केले जाते. प्रशासनातर्फे कर न भरणार्‍या मालमत्ताधारकांची प्राथमिक माहिती काढली असता चारही प्रभागांत एकूण 384 मालमत्ता जागेवर अस्तित्वातच नसल्याची माहिती समोर आली आहे. दूध फेडरेशन जवळील स्थलांतरित झोपडपट्टीसह इतर ठिकाणी अशाच प्रकारे बखळ पडलेल्या जागांवर कागदोपत्री मालमत्ता कराची आकारणी सुरूच आहे.
या रकमेचा भरणा होत नसल्याने 25 लाखांवर थकबाकीचा आकडा झाला आहे. पैसे मिळत नाही आणि मालमत्ताही जागेवर नसल्याने या सर्व बखळ जागांचे पंचनामे करण्याचे आदेश मनपातर्फे दिले आहेत. कर अधीक्षकांनी दोन आठवड्यात या मालमत्तेच्या पंचनाम्यांचा अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
आकडे निर्लेखित करणार
सध्या अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेवर सुरू असलेल्या करआकारणीमुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे. प्रत्यक्ष पंचनामे करून समोर आलेल्या माहितीच्या आधारे बखळ जागा असलेल्या ठिकाणच्या मालमत्तेची आकडेवारी निर्लेखित करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिली.