आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा न पुरवणाऱ्या मनपाने करवाढ टाळली, कर न वाढवण्याचे सलग तिसरे वर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेची खालावलेली अार्थिक परिस्थिती पाहता अाहे त्या चक्रातून मार्ग काढत किमान मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अायुक्तांनी ५९३ काेटी ९५ लाखांचे अंदाजपत्रक साेमवारी मनपाच्या विशेष स्थायी समितीसमोर सादर केले.
 
कर्जफेड अाणि अडकून पडलेले उत्पन्न यामुळे विकास कामाला पैसा नसल्याने यंदा देखील मनपाने कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा दिला अाहे. तसेच कराचा बेस वाढवण्यावर अधिक भर दिला अाहे. येत्या वर्षभरात नाहक होणारा खर्च टाळण्यासाठी काटकसर अाणि लोकसहभागातून विविध विकासाची कामे करण्याचा मानस व्यक्त केला. कर न वाढीचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

महापालिकेचे बजेट सोमवारी सकाळी ११ वाजता सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजित विशेष स्थायी समितीत मांडण्यात अाले. या वेळी अायुक्त जीवन साेनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगर सचिव डी. अार. पाटील यांच्यासह १६ पैकी १० सदस्यांची उपस्थिती हाेती. ५९३ काेटी ९५ लाखांच्या अंदाजपत्रकात महापालिकेचे १६२ काेटी २१ लाखांचे स्व उत्पन्न नमूद करण्यात अाले असून ६ काेटी ७१ लाखांचा शिलकीचे अंदाजपत्रक अाहे. अंदाजपत्रकाचा अभ्यास करून त्यात बदल सुचवण्यासाठी सभापतींनी सभा तहकुब करण्याची घाेषणा केली. 

गाळ्यांचे भाडे अडकले
मनपाच्या २१ व्यापारी संकुलातील २४३८ गाळ्यांचा करार २०१२ पासून संपला अाहे. दर महिन्याला गाळे भाड्यातून १५ काेटी गृहीत धरले तरी ७५ काेटींचा महसूल अडकला अाहे. गाळ्यासंदर्भात केलेल्या ठराव क्रमांक ४० वरील स्थगिती उठवण्यासाठी दरमहा पत्रव्यवहार सुरू अाहे. यातून मार्ग निघेल, असा विश्वास अायुक्तांनी व्यक्त केला.  

उत्पन्न व खर्चातील ठळक बाबी
जमा : पारगमन शुल्क उत्पन्न निरंक, एलबीटी कर ४६ काेटी ५६ लाख, खुला भूखंड कर २६ काेटी ५२ लाख, घरपट्टी कर २२ काेटी ६३ लाख, वृक्ष कर व जाहिरात कर १ काेटी ५५ लाख, नगररचना विभागाकडील कर ८ काेटी ८८ लाख, वैद्यकीय सेवा, बाजार, मनपा मिळकतीपासून मिळणारे किरकाेळ उत्पन्न ३१ काेटी ६० लाख, अनुदाने ९५ काेटी १५ लाख, मार्केट, घरकुल, व्यापारी संकुल शुल्क ६ लाख, शासकीय याेजना, देवाण-घेवाण ३४ काेटी ९३ लाख, परिवहन व स्वामित्व धन व उत्पन्न ८ लाख, अारंभीची शिल्लक ३० काेटी ३७ लाख, विविध मनपा निधी ८१ काेटी ८३ लाख, विविध शासकीय निधी १८८ काेटी १ लाख
एकूण जमा ५९३ काेटी ९५ लाख 

खर्च : मनपा कर्मचारी निवृत्तिवेतन १०० काेटी १९ लाख, सामान्य प्रशासन ४ काेटी ८ लाख, सार्वजनिक सुरक्षितता ५ काेटी ५५ लाख, सार्वजनिक अाराेग्य व सुखसाेई ३६ काेटी ५६ लाख, सार्वजनिक शिक्षण २१ काेटी ६० लाख, इतर किरकाेळ २ काेटी ९० लाख, कर्जफेड ४८ काेटी ५ लाख, थकत देणे २० काेटी, मनपा निधी, शासन अनुदान ३१ काेटी ७१ लाख, अनामत परतावे, देवाण-घेवाण २५ काेटी ३५ लाख, परिवहन अाठ लाख, पाणीपुरवठा खर्च २० काेटी ३ लाख, पावसाच्या पाण्याची निचरा व्यवस्था १ काेटी ३० लाख, अखेरची शिल्लक ६ काेटी ७१ लाख, विविध मनपा निधी ८१ काेटी ८३ लाख, विविध शासकीय निधी १८८ काेटी १ लाख
एकूण जमा ५९३ काेटी ९५ लाख
 
बातम्या आणखी आहेत...