आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल प्रकरण: अाजी-माजी १० नगरसेवकांची अायुक्तांच्या दरबारी हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरकुल योजनेच्या विविध ठरावांना संमती दिलेल्या पालिकेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या अाजी-माजी नगरसेवकांच्या सुनावणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १० जणांनी स्वत: एकाने प्रतिनिधी मार्फत हजेरी नोंदवली. अापली बाजू मांडण्यासाठी मुदत मिळण्याची विनंती वकिलामार्फत केली. त्यामुळे २२ मार्च राेजी पुढील सुनावणी हाेणार अाहे. गुरुवारी अन्य १२ जणांना सुनावणीसाठी बोलावण्यात अाले अाहे. 
 
घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमुळे पालिकेचे ६० काेटी ३२ लाखांचे अार्थिक नुकसान झाल्याचा ठपका लेखा परीक्षणात नोंदवण्यात अाला अाहे. या योजनेसाठी करण्यात अालेल्या ठरावांना संमती देणारे नगरसेवकच झालेल्या नुकसानीस जबाबदार असल्याने त्यांच्याकडून ती वसुली करावी, असे आदेश करण्यात अाले हाेेते. त्यानुसार अायुक्तांनी प्रत्येक नगरसेवकाला काेटी १६ लाख रुपयांची नोटीस बजावली हाेती. ती नोटीस अाैरंगाबाद खंडपीठाने रद्द करत नगरसेवकांचे म्हणणे एेकून घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार बुधवारी सुनावणी झाली. 
 
वकिलांनी सुनावणीवर घेतली हरकत 
सर्वअाजी-माजी नगरसेवकांच्या वतीने अॅड. डी.एच.परांजपे यांनी वकीलपत्र सादर करत सुनावणीला हरकत घेतली. नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करण्याचे अधिकार विभागीय अायुक्तांना असल्याने आक्षेप नोंदवला. दरम्यान कागदपत्रांची मागणी करत नगरसेवकांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी पुढची तारीख मिळण्याची विनंती केली. त्यानुसार अायुक्तांनी सर्वांसाठी २२ मार्च राेजी म्हणणे मांडण्यासाठी तारीख निश्चित केली. या वेळी लेखापरीक्षक डी.अार. पाटील, त्यांचे सहकारी अनिल बिऱ्हाडे, रवींद्र कदम हे दालनात उपस्थित हाेते. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांत अायुक्तांच्या दालनात येण्याचा याेग अालेल्या नगरसेवकांना घरकुलच्या निमित्ताने सतरा मजलीत पुन्हा चकरा माराव्या लागणार अाहेत. नगरसेवकांच्या निमित्ताने सकाळी अायुक्तांच्या दालनात समर्थकांची गर्दी झाली हाेती. 
 
ढंढाेरे, चाैधरी अाणि पाटलांची हजेरी 
महापालिकाअायुक्त जीवन सोनवणेंच्या दालनात सकाळी १० ते १२ या वेळेत सुनावणीसाठी वेळ निश्चित करण्यात अाली हाेती. त्यानुसार सकाळीच माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढाेरे, लक्ष्मीकांत चौधरी, पुष्पा प्रकाश पाटील, माजी महापौर अशोक सपकाळे, नगरसेवक इक्बालाेद्दीन पिरजादे, माजी नगरसेवक डी.डी. वाणी, अफजलखान रऊफ पटवे, मंजुळा धर्मेंद्र कदम, देविदास धांडे, शांताराम सपकाळे यांनी हजेरी लावत स्वाक्षरी केली. तसेच माजी महापौर प्रदीप रायसोनी यांचे प्रतिनिधी म्हणून गोविंद वानखेडे यांनी उपस्थिती दिली. तर महेंद्र तंगू सपकाळे यांची अनुपस्थिती हाेती. 
 
त्रयस्थ अर्जदारही मांडणार बाजू 
या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार त्रयस्थ अर्जदार दीपक गुप्ता हे देखील बाजू मांडणार अाहेत. यासंदर्भात त्यांनी अायुक्तांना पत्र देखील दिले. दरम्यान, गुरुवारी देखील सुनावणी हाेणार असली तरी सर्वाच्या वतीने एकच वकील बाजू मांडणार असल्याने सर्व नगरसेवकांना २२ मार्च राेजी सुनावणीसाठी बोलावण्यात येणार अाहे. परंतु अाजी-माजी नगरसेवकांना हजेरी नोंदवावी लागणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...