आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलईडी लाइटसाठी लागणार 11 काेटी, महापालिकेचा 25 कोटींच्या निधीतून प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - २५ काेटींतून रस्त्यांची कामे बाद हाेणे जवळजवळ निश्चित मानले जात अाहे. त्यामुळे या निधीचा वापर वीज बचतीसाठी करण्याचा प्रस्ताव पुढे अाला अाहे. पालिकेला संपूर्ण शहरात एलईडी बल्ब लावण्यासाठी तब्बल ११ काेटींचा खर्च येणार अाहे. परंतु, यामुळे वार्षिक २१ लाख वीज युनिटची बचत हाेणार असून पालिकेचाही सुमारे दीड काेटीच्या अासपास खर्च वाचणार अाहे. पालिकेने विजेचा वापर कमी केल्यामुळे वाचलेली वीज नागरिकांना देता येणे शक्य होईल.
 
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ काेटींच्या निधीतून रस्त्यांव्यतिरिक्त काेणती कामे करावीत, याबाबत सध्या राजकीय प्रशासकीय पातळीवर चर्चांना वेग अाला अाहे. शहराच्या महापालिकेच्या हिताची काेणती कामे करता येतील यासाठी विविध पर्यांयांचा विचार सुरू अाहे. त्यात आता शहरातील बंद पडलेले पथदिवे, गल्ली-बाेळात असलेला अंधार त्यामुळे सर्वसामान्यांना हाेणारा त्रास पाहता विद्युत प्रकाश यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू झाला अाहे. सध्या शहरात सुमारे १६ हजार ७०० पथदिवे असून त्यावर असलेल्या ट्यूब, हॅलाेजन, साेडियम, टी- अशा वेगवेगळ्या दिव्यांसाठी पालिकेला वार्षिक सुमारे काेटी रुपयांचा वीज बिलाचा भरणा करावा लागताे.

त्यामुळे हाच खर्च कमी करून नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार अाहे. संपूर्ण शहरातील प्रत्येक विजेच्या पाेलवर एलईडी बल्ब लावल्यास वार्षिक २१ लाख वीज युनिटची बचत हाेणार अाहे. त्यापाेटी खर्च हाेणारा सुमारे दीड काेटींचा निधीही वाचणार अाहे. यामुळे पालिकेच्या तिजाेरीवर पडणारा अार्थिक बाेजा कमी हाेणे शक्य अाहे. २५ काेटींच्या निधीतून हा खर्च केल्यास संपूर्ण शहरात झगमगाट हाेईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमाेर मनपातर्फे प्रस्ताव सादर केला जाणार अाहे.
 
शहरातील शिवाजीनगर पूल ते पुष्पलाता बेंडाळे चौक, रेल्वे स्टेशन ते नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप ते स्वतंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, नेहरू चौक ते दधिची चौक , दाणाबाजार परिसर, महापालिका सेन्ट्रल फुले मार्केट परिसर, चौबे स्कूल, चौक, सुभाष चौक ते पुष्पलता बेंडाळे चौक, चित्रा टॉकीज चौक ते कोर्ट चौक, गोलाणी मार्केट परिसर, अरुण बुक डेपो ते कोंबडी बाजार चौक, सराफ बाजार चौक या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवर परिसरांमध्ये असलेल्या ओव्हरहेड वीजवाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता अाहे. महापालिकेने यापूर्वी महावितरण कंपनीकडे हा प्रस्ताव दिला अाहे. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता भूमिगत वीजवाहिन्यांची गरज अाहे. यासंदर्भातही प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...