आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर हागणदारीमुक्त झाल्यास महापालिकेची रसद बंद हाेणार, नगरसेवकांना दिले पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कराची वसुली हगणदारीमुक्त शहर या दाेन विषयांवर फाेकस केलेल्या महापालिकेची सत्वपरीक्षा सुरू झाली अाहे. मे पर्यंत शहर हगणदारीमुक्त झाल्यास शासनाकडुन मिळणारे विविध विशेष याेजनांचे बंद करण्याचा इशारा दिला अाहे. त्यामुळे ५८ ठिकाण हगणदारीमुक्त झाली तरी त्यात सातत्य ठेवण्यासाठी अाता नगरसेवकांनाच मदतीसाठी हाक दिली अाहे. 
 
शहर, गाव सर्वांनाच हगणदारीमुक्तीचे काम करण्याचे अादेश अाहेत. जळगाव महापालिकेनेही शहरातील उघड्यावर शाैचास जाण्याची ५८ ठिकाणांचा शाेध घेवून त्यापैकी ५७ ठिकाणे हगणदारीमुक्त केली अाहेत. उर्वरित एक ठिकाण देखिल लवकरच हगणदारीमुक्त हाेणार अाहेत.तर या मोहिमेत सातत्य ठेवण्याचे माेठे अाव्हान प्रशासनासमाेर अाहे. त्यात अाता शासनाने अादेश काढून पालिकांची अार्थिक काेंडी करण्याचा इशारा दिला अाहे. १५ मार्च पर्यंत हगणदारीमुक्तीचे उद्दीष्ट ठेवलेल्या पालिकेला मे पर्यंत शहर हगणदारीमुक्त झाल्यास अनुदान बंद करण्याचा इशारा देऊन पालिकेची सत्वपरीक्षा घेण्यास सुरूवात केली अाहे. 
 
नगरसेवकांवर मदार 
हागणदारीमुक्तशहरसंदर्भात अायुक्त जीवन साेनवणे यांनी सर्व नगरसेवकांना पत्र दिले अाहे. त्यात शासनाने अनुदान बंद करण्याचा इशारा दिल्याची माहिती कळवली अाहे. ५८ ठिकाणे हागणदारीमुक्त झाली तरीही त्यात सातत्य टिकवणे गरजेचे अाहे. त्यासाठी नगरसेवकांच्या मदतीची गरज असल्याचे पत्रात म्हटले अाहे. वाॅर्डात कोठेही उघड्यावर शाैचास जाणार नाही यासाठी मदत करावी, असे अावाहन केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...