आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर शाैचास गेल्यास आता गुन्हा दाखल हाेणार, मनपा प्रशासनाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने गेल्या सहा महिन्यांपासून सुरू ठेवलेल्या प्रयत्नांमुळे अाता यश हाती येऊ लागले अाहे. शहरातील उघड्यावर शौचास जाण्याची ५८ पैकी ४५ ठिकाणे हागणदारीमुक्त करण्यात अाली अाहेत. मार्चपर्यंत उर्वरित सर्व ठिकाणांचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार अाहे. मात्र त्यानंतर शहरात कुणीही उघड्यावर शाैचास गेल्याचे आढळल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करून त्यांना जेलची हवा खाण्यासाठी रवाना केले जाणार अाहे. 
 
महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहर हागणदारीमुक्तीसाठी १५ मार्च ही शेवटची तारीख निश्चित केली अाहे. यादरम्यान शहरातील उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था करून दिली जात अाहे. यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती त्यांची दिवसातून दाेन वेळा साफसफाई करण्यात येणार अाहे. सद्य:स्थितीत शहरातील ५८ पैकी ४५ ठिकाणे हागणदारीमुक्त करण्यात अाली अाहेत. उर्वरित १३ ठिकाणे येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हागणदारीमुक्त करण्यात येणार अाहेत. मार्च हा शेवटचा दिवस निश्चित करण्यात अाला असून त्यानंतर शहरात कुठेही उघड्यावर शौचास बसल्याचे आढळल्यास पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अायुक्त जीवन सोनवणेंनी सांगितले. 
 
...म्हणून दंड माफ 
गेल्यादाेन महिन्यांपासून आराेग्य विभागातील निरीक्षकांना त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात हाेते. दरम्यान, वैयक्तिक शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्यात यश येत नसल्याने निरीक्षकांना कामाला लावण्यासाठी अायुक्तांनी थेट दंडाची कारवाई सुरू केली हाेती. १०० रुपयांपासून सुरू झालेल्या दंडाची रक्कम तब्बल हजार रुपयांपर्यंत पाेहोचला हाेता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर हाेता. एकीकडे वैयक्तिक शौचालयांचे काम हाेत नसताना; दुसरीकडे मात्र उघड्यावरील ठिकाणे हागणदारीमुक्त हाेत असल्याने अायुक्तांनी कामात प्रगती हाेत असल्याने अातापर्यंत केलेले दंड माफ करण्याचा निर्णय घेतला अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...