आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्राने वार करून युवकाचा निर्घृण खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अशोक चित्रपटगृह परिसरातील शाहरुख सादिक पटेल याचा मेहरूण तलावाकाठी निर्घृणपणे खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही संशयितांना सोमवारी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
शाहरुख (वय 18) हा रविवारी रात्री 8 वाजेपासून घरून बेपत्ता होता. सोमवारी तो मेहरूण तलावाकाठी मृतावस्थेत आढळून आला. धारदार शस्त्राने त्याच्या शरीरावर 16 वार करण्यात आले आहेत. तसेच गळ्यापासून ते जबड्यापर्यंतचा भाग कापलेला आहे. सकाळी फिरायला जाणार्‍या काही लोकांनी पोलिसांना ही घटना कळवली व दुपारी 12 वाजता शाहरुखची ओळख पटली. घटनास्थळी चौकशी करण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका, उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, निरीक्षक प्रभाकर रायते, विलास काळे आले होते. त्यांनतर श्वान पथक आले पण ते जागेवरच घुटमळले. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करून शाहरुखचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी आसिफ पटेल यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशी पटली ओळख : शाहरुखच्या खिशात अमर भरीत सेंटरचे एक व्हिजीटिंग कार्ड होते, तर त्या कार्डच्या मागे पेनाने किशोर नाव व मोबाइल नंबर लिहिला होता. त्यामुळे पोलिसांनी अमर भरीत सेंटरचे संचालक सुनील पाटील आणि किशोर यांना घटनास्थळी बोलविले. शाहरुख किशोरला गोलाणी मार्केटमध्ये दोन दिवसांपूर्वी भेटला होता; पण किशोर त्याला ओळखत नव्हता. तर सुनील पाटील यांनी शाहरुखला लगेच ओळखले व तो अशोक टॉकीजजवळ राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पाटील आणि किशोर यांच्या मदतीने शाहरुखचे घर शोधले.

2 वर्षांपूर्वीच शाळा सोडल
शाहरुखने नूतन मराठा विद्यालयात 8 वीला प्रवेश घेतलेला होता; मात्र दोन वर्षांपासून तो शाळेत जात नव्हता. तसेच तो किराणा, कापड दुकानात काम आणि सिमकार्ड विक्री करून पैसे कमावत होता. त्याचे वडील सादिक पटेल हे मॅकेनिकल होते; मात्र सध्या ते घरीच असत. त्याला पाच भाऊ व एक बहीण असून, तो सर्वात लहान मुलगा होता.