आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाला ट्रकची धडक; चालक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव  : राष्ट्रीय महामार्गावर शिव काॅलनी रेल्वे पुलाजवळ गुरुवारी दुपारी वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोल पंपाकडून येणाऱ्या रिक्षाला ट्रकने मागून जाेरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट नवजीवन सुपरशॉपीच्या दिशेने जाऊन कलंडली. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नसली तरी, रिक्षाचालक मात्र गंभीर जखमी झाला आहे.
 
गणेश काॅलनी परिसरातील ख्वाजामियाँ चाैकातील पालीवाल टेंट हाऊसची रिक्षा (क्र. एमएच-१९/एस-८८४) गुजराल पेट्राेलपंप परिसरातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी साहित्य टाकून परत येत हाेती. त्या वेळी शिव काॅलनीजवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जाेरदार धडक दिली.
 
 यामुळे रिक्षाचालक कैलास दामू साळवे (वय ३२, रा. हुडकाे) यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट एका शॉपीच्या दिशेने जाऊन कलंडली. रिक्षाचालक कैलास साळवे अाणि मागे बसलेले अनिल भाऊलाल शिरसाट यांनी वेळीच बाजूला उडी मारली. मात्र, त्यात साळवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली अाहे. 
 
धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला अाहे. जखमी साळवे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. 
 
मात्र, टेंट हाऊसच्या मालकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने याप्रकरणी काेणताही गुन्हा दाखल झाला नाही. काही वेळानंतर अपघातग्रस्त रिक्षा टेंट हाऊसचे कर्मचाऱ्यांनी उचलून घेऊन गेले. 
 
- शिव काॅलनी रेल्वे पुलाजवळील घटना 
- घटनास्थळावरून चालक ट्रक घेऊन पसार 
बातम्या आणखी आहेत...