आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon NCP Leader Apologies For Ajit Pawar Statement

अजित पवारांची चूक; कार्यकर्त्यांचे प्रायश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी रान उठवले आहे. त्यामुळे पवारांचे जळगावातील निष्ठावंतही या वादापासून स्वत:ला वेगळे ठेवू इच्छित नाहीत. त्यांच्या चांगल्या कामांचे श्रेय आम्ही घेतो; मग त्यांच्या चुकांचे प्रायचित्तसुद्धा घेणार असल्याचे सांगत विनोद देशमुख यांनी जनतेसमोर नतमस्तक होत माफीनामा जाहीर केला आहे.

अजितदादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चांगली कामे केली असून, समाजोपयोगी निर्णयही घेतले आहेत. याशिवाय काम घेऊन येणार्‍यांना ते कधी निराश करत नाहीत.

सकाळी 6 वाजेपासून ते लोकांना भेटण्यास सुरुवात करतात. त्यांच्याकडे काम घेऊन जाताना मध्यस्थाची गरज भासत नाही. त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामांचे र्शेय जसे आम्ही नेहमी घेतो, तसेच त्यांच्या तोंडून इंदापूरच्या सभेत जे चुकीचे शब्द निघाले त्या चुकीतही आम्ही स्वत: सहभागी होत असल्याचे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

राजीनाम्याची मागणी
उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत राजीनामा देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.