आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे नवे एसपी दत्तात्रय कराळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली झाली आहे. नाशिक शहराचे उपायुक्त दत्तात्रय कराळे हे जळगावचे नवीन पाेलिस अधीक्षक असतील. 
 
अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची पदोन्नतीवर वाशिम पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी पैठणचे सहाय्यक पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची नियुक्ती झाली अाहे. धुळ्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नागपूर येथील राज्य राखीव पाेलिस दल गट क्रमांक चारचे समादेशक एम. रामकुमार यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची अाैरंगाबाद येथे बदली झाली अाहे. भारतीय पाेलिस सेवेतील पाेलिस अधीक्षक, पाेलिस उपअायुक्त विशेष पाेलिस महानिरीक्षक दर्जाच्या राज्यातील १३७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात अाल्याचे अादेश गृह विभागाने काढले अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...