आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यथा रेक्टरची: आता होस्टेल हेच घर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: सुट्यांचे फीवर सगळीकडे असताना काही असेही आहेत की त्यांना सुट्या कधीच उपभोगायला मिळत नाही. कामाच्या बाबतीत सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणाल तर आजच्या काळात ती मुलींची असते. आताच्या काळात मुलींची जबाबदारी पार पाडणे खूप मोठी गोष्ट आहे. घरात, कुटुंबात मुलींचा सांभाळ करणे वेगळी बाब असते. मात्र, वसतिगृहाच्या एकाच छताखाली 400 ते 500 मुलींचा सांभाळ करणे म्हणजे जबाबदारीचे काम असते आणि असेच 365 दिवस डोळ्यात तेल घालुन मुलींचा सांभाळ करणारे रेक्टर व तेथील कर्मचार्‍यांना कधीच सुट्या नसतात. प्रत्येक मुलीचा वैयक्तिक विचार करुन मुलींना काय हवे आहे, काय नको आहे. तसेच त्यांना कसला त्रास तर नाही ना? या सगळ्या बाबींवर त्यांचे बारीक लक्ष असते. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता त्या मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहेत. मुली गेल्या की त्यांनाही करमत नाही. एकावेळी अनेक भूमिका या अधीक्षिकांना निभवाव्या लागतात. कुटुंबाप्रमाणेच वातावरण याठिकाणी निर्माण झालेले असते. अशा सगळ्या जबाबदार्‍या पार पाडत मुलींना सुट्या लागल्या की त्यांचा वेळ हा कुटुंबासाठी राखीव होऊन जातो.
लग्नासाठीच बाहेरगावी

इतर वेळेला मला कधीच कुठे वसतिगृह सोडून जाता येत नाही. कधी झोपेतून उठूनही रात्री यावे लागते. आमच्या हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुली, महिला असतात. त्यामुळे प्रत्येकीला समजून घ्यावे लागते. खूपच जबाबदारीचे काम असल्याने वेळच मिळत नाही. मीच त्या मुलींची पालक, नातेवाईक सगळी आहे. त्यांच्यासाठी सगळ्या भूमिका पार पाडत त्यांचे दु:ख दूर करावे लागते. म्हणूनच कधी कुटुंबासोबत जाणे शक्य होत नाही; परंतु जर कधी अधिकच जरुरीचे काम निघाले किंवा लग्न, समारंभ असेल तरच मी बाहेरगावी जाते. त्याच वेळेला नातेवाइकांना भेटून घ्यावे. सुट्या अजिबात नसतात. प्रीती पैठणकर, आशादीप शासकीय महिला वसतिगृह