आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: गणेश कॉलनीतील वाइन शॉप रात्री 8 वाजता बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री 8 वाजताच बंद झालेले गणेश कॉलनी चौकातील ‘अपना वाइन’ - Divya Marathi
रात्री 8 वाजताच बंद झालेले गणेश कॉलनी चौकातील ‘अपना वाइन’
जळगाव: गणेश कॉलनी चौकातील अपना वाइन या दारू दुकानासमोरील रस्त्यावर मद्यपींनी सुरू केलेल्या गोंधळाला कंटाळून परिसरातील नागरिक महिलांनी सोमवारी रात्री बैठक घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केल्याने अपना वाइन शॉपच्या चालकाने मंगळवारी रात्री आठ वाजताच दुकानाचे शटर डाऊन केले. रात्री १० वाजेपर्यंत सुरू असणारा हा गाेंधळ दाेन तास अाधीच उरकला गेल्या. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांपूर्वीच ‘दिव्य मराठी’ने ‘काउंटर पेग’ अभियान राबवून प्रकाश टाकला होता. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरातील ४५ दारू दुकानांना टाळे लागले अाहे. शहरात सध्या दाेनच वाइन शाॅप सुरू अाहेत. गणेश काॅलनी रामानंदनगरातील या दारू दुकानांमध्ये सुमारे दाेन किलाेमीटरचे अंतर अाहे. त्यामुळे महामार्गाच्या उत्तरेकडील भागातील मद्यप्रेमी गणेश काॅलनीत अपना वाईन या दुकानासमाेर गर्दी करू लागले अाहेत. या ठिकाणी दरराेज दारुड्यांची जत्रा भरत अाहे. मात्र, त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरच बार सुरू झाल्यामुळे परिसरातील महिला पुरुषांनी अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. थेट दुकानासमाेरच अांदाेलन करून जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्याचा निर्धार केला आहे.
 
साेमवारी नागरिकांची झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने स्थानिक रहिवासी महिलांच्या भावना मांडल्या. त्यामुळे नागरिकांची नाहक नाराजी अाेढवून घेण्यापेक्षा अपना वाईनच्या चालकांनी मंगळवारी रात्री वाजताच दुकान बंद करून घेतले. यामुळे गेल्या अाठवडाभरापासून हाेणाऱ्या गर्दीतही घट झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दारू पिणाऱ्यांची गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची काेंडी साेडवण्यासाठी अाजूबाजूच्या दुकानदारांना रस्त्यावर उतरून दारूड्यांना बाजूला करावे लागते. त्यामुळे नागरिकांचा राेष वाढत असून वाइन शाॅपच्या चालकाला भविष्याच्या दृष्टीने जनहिताचा विचार करणे भाग पडेल, अशा भावना व्यक्त हाेऊ लागल्या अाहेत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...