आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापारी गाळ्यांसंदर्भात आठवडाभरात बैठक,खडसेंनी पुन्हा घेतली नगरविकास सचिवांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलावाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आगामी काळात धोरण ठरवण्यासाठी आठवडाभरात मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांतसिंग यांच्याशी चर्चा केली.


न्यायालयीन व मंत्रालयस्तरावर वादात अडकलेल्या व्यापारी संकुलातील गाळेप्रकरणी गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते खडसे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिवांना आदेश करत गाळे लिलावाच्या प्रक्रियेला स्थगितीचे आदेश दिले होते. यासंदर्भात महापालिकेला अधिकृत आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालिकेतर्फे लिलावाची प्रक्रिया सुरूच आहे. यासंदर्भात एकनाथ खडसेंनी नगरविकास विभागाचे सचिव र्शीकांतसिंग यांची भेट घेऊन पुन्हा चर्चा केली.

यात गाळे 30 वर्षांनी द्यायचे असले तरी गाळ्यांचे भाडे व प्रीमियमची रक्कम यासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांकडून बैठकीची तारीख निश्चित झाल्यानंतर मुख्य सचिव, नगरविकास सचिव, विरोधी पक्षनेते खडसे, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची बैठक येत्या आठवडाभरात होणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.