आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बढे पतसंस्था अवसायनात काढण्‍याचा सहकार आयुक्तांचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अनागोंदी कारभारामुळे वादग्रस्त ठरलेली चंद्रकांत हरी बढे सहकारी पतसंस्था लिक्विडेशन (अवसायनात)मध्ये काढण्याचा अंतरिम आदेश राज्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी सोमवारी काढला. यामुळे संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बढे संस्था अवसायनात काढण्यात आल्याच्या वृत्तास सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनीही दुजोरा दिला; मात्र याबाबतच्या आदेशाची प्रत सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयास प्राप्त झाली नसल्याचे सांगितले.


राज्यभरातील ठेवीदारांच्या 200 कोटींच्या ठेवी बढे पतसंस्थेत अडकल्या. संबंधितांना या ठेवी परत करण्यासाठी सहकार विभागाने वारंवार सक्त सूचना देऊनही त्याकडे संस्थाचालकांनी दुर्लक्ष केले. तसेच वसुली करताना बेकायदा मॅचिंगचे व्यवहार करून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. त्यामुळे या संस्थेची लिक्विडिटी पूर्णपणे संपल्याचा 20 पानांचा अहवाल जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी महिनाभरापूर्वीच सहकार आयुक्तांकडे सादर केला होता. या अहवालावरून बढे पतसंस्था अवसायनात काढण्याचा आदेश आयुक्तांनी दिला.