आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधविक्रीची नोंद करणे केमिस्टना बंधनकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक केल्यानंतर आता केंद्र सरकारने विक्री होणार्‍या प्रत्येक औषधाची नोंद करण्यासाठी रजिस्टर ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यात डॉक्टर, रुग्णाचे नाव, औषधांची माहिती व बिलाचा क्रमांक नमूद करावा लागेल. हे नोंद रजिस्टर तीन वर्षांपर्यंत सांभाळून ठेवावे लागणार असून, या अधिसूचनेची 1 मार्चपासून राज्यात अंमलबजावणी सुरू होणार आहे.


केंद्र सरकारच्या आरोग्य व कु टुंबकल्याण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी करून औषधविक्रीच्या प्रत्येक दुकानात नोंद रजिस्टर ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940च्या नियम 1945मध्ये सुधारणा करून अनुसूची ‘एच-1’चा अंतर्भाव करण्यात आला आहे.


यांचा समावेश : अल्पैजोलम, बालोफ्लोक्सासिन, बुप्रेनोरफिन, कैप्रेओमाइसिन, सेफाडिनीर, सेफडिटानर, सेफेपाइम, सेफेटामेट, सेफीजाइम, सेफोजाइम, सेफोपेराजोन, सेफोटेक्सिम, सेफपिरोम, सेफपोडोजाइम, सेफ्टाजिडीम, सेफ्टीबुटेन, सेफ्टीजोजाइम, सेफ्टीयाजोन, क्लोरडाइजेपोक्साइड, कोडीन, साइक्लोसेराइन, डाइजपाम, डिफेनोक्सिलेट, डोरिपेनेम, एरटापेनेम, इथामबुटोल हाइड्रोक्लोराइड, एथियोनामाइड, फेरोपेनेम, जेमीफ्लोक्सासिन, इमीपेनेम, इसोनियजीड, लेवोफ्लोक्सासिन, मेरापेनाम, मिडाजोलाम, मोक्सिफ्लोक्सासिन, निट्राजेपाम, पेंटाजोसिन, प्रुलिफ्लोक्सासिन, पाइराजिनामाइड, रिफाबुटीन, रिफाम्पिसिन, सोडिअम पैरा-अमिनोसालिसाइलेट, स्पारफ्लोक्सासिन, थायसिटाजोन, टारामाडोल, जोपिडेम या औषधांचाही समावेश असेल.


प्रत्येक रुग्णाची असेल माहिती
बर्‍याचदा एखाद्या औषधामुळे रुग्णाला साइड इफेक्ट होतात व रिअँक्शनही होते. त्यामुळे औषधांचे नमुने फेल झाल्यास अशी औषधे कोणाला विक्री झाली आहेत हे पाहण्यासाठी या कायद्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी औषधे घेण्यासाठी आलेल्या रुग्णाचे नाव, औषधे लिहून देणार्‍या डॉक्टरांचे नाव, औषधे कोणती, किती दिली, बिलाचा क्रमांक व तारीख ही माहिती औषधविक्रेत्यांकडे नोंदवली जाईल. त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ती औषधे परत मागवता येणार आहेत.

त्यात 46 औषधांचा असेल समावेश
कायद्यातील या नवीन बदलामुळे अनुसूची ‘एच-1’मध्ये आता 46 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूची ‘एक्स’मध्ये केटामाइन इंजेक्शन व स्वाइन फ्लूच्या औषधांची नोंद ठेवली जाते. तशीच नोंद ‘एच-1’मध्ये असणार आहे. त्यात झोपेच्या गोळ्या, गुंगी आणणारे औषध, मानसिक रुग्णांना देण्यात येणार्‍या औषधांसह हायर अँटिबायोटिकचाही समावेश असेल.


शनिवारपासून अंमलबजावणी सुरू
कायद्यातील बदलानुसार 1 मार्चपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच औषधविक्रेत्यांनी रजिस्टरमध्ये काय नोंद करावी, यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक विक्रेत्याने हे नोंद रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. हेमंत मेटकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन